01 June, 2020

अभ्यासमाला (दीक्षा ) यशोगाथा - ३३


जि.प.प्रा.शा. लिखीत पिंपरी केंद्र आष्टी ता.परतूर, जि जालना

पटसंख्या -56
झुम अँप शाळा सहभागी विद्यार्थी- 35

        सन्माननीय केंद्रप्रमुख मा. नामदेवराव धुमाळ यांच्या प्रेरणेतून झूम शाळा द्वारे मुलां सोबत हितगुज करावे या उद्देशाने  हे आव्हान आम्हीं हाती घेतले माझे सहकारी दत्तात्रय मरनांगे ,बोरोड श्रीराम  सुरुवातीला पालकांचा व्हॅट अँप ग्रुप तयार केला. ग्रामीण भाग असल्याने पालकात उदासीनता दिसुन येत होती आम्ही सातत्याने प्रत्यक्ष मोबाईल वर फ़ोन करून  आपल्या देशात आलेले संकट या संकटात मुलाचे होणारे शैक्षणिक नुकसान यांची माहिती दिली यावर उपाय म्हणून झुम अँप मिटींग हा एक पर्याय आहे पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. 
         झुम अँप मध्ये पालकांची मिटींग घेतली त्यात मी मुख्याध्यापक नात्याने पालकांशी संवाद साधला दिक्षा अँप ,ऑनलाईन चाचणी सोडविण्याचे आव्हान केले. त्याचे शॉर्ट स्क्रीन शाळेच्या व्हॅट अँप ग्रुपवर share केले यातून नवीन चेतना मिळाली.  मग शाळेत दररोज सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सातत्याने विद्यार्थ्यासोबत विद्यार्थ्यासोबत एखादा घटक घेऊन त्यावर चर्चा घडवून आणू लागलो पण कुठतरी  याला दिशा मिळत नव्हती.मी आय टी CRG श्री. मुंडे सरांना फोन केला त्यांनी TESTMOJ  चाचणी कशी करायची याचे मोलाचे मार्गदर्शन केले मी जवळपास 20 गृहपाठ चाचणी तयार केल्या आणि ग्रुप वर share करुन सोडवून घेणे सुरू झाले. 
        SCERT कडून येणारी अभ्यास माला  सर्व मुलं काही पाहत नव्हतें , एके दिवशी मी पुन्हा पालकांची झुम मिटींग आयोजित केली त्यात मा.डॉ.प्रकाश मांटे सरांनी पालकांना मार्गदर्शन केले यातून नवी उभारी मिळाली.ग्रुपवर गृहपाठ देने मुलं गृप वर वहीत लिहून त्याचे फोटो ग्रुपवर टाकतात त्याच कौतुक आम्ही सतत करतो एवढ करूनही आमचं समाधान होत नव्हत, त्यांत चेक पोस्ट ड्युटी. 
         शेवटी डायटचे,मा.श्रीकृष्ण निहाळ सर यांना फोन केला सर्व स्पष्ठ अडचणी सांगितल्या त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या झूम अँप शाळेला भेट ध्या त्यांनी लगेच होकार दिला. मग मला काळजी वाटत होती की पालक सह विध्यर्थी सहभागी होतात की नाही. मिटींग ची वेळ झाली 17 पालकांसह विध्यर्थी सहभागी झाले यात श्रीकृष्ण निहाळ सरांनी मागदर्शन केलं,आणि नवसंजीवनी मिळाली.त्यांनी दिलेल्या दिशेने पुन्हा काम सुरू केले त्यात   SCERT कडून येणारी अभ्यासमाला झूम अँप वर स्क्रीन शेअर करून मी स्वतः त्यात थोडी माहिती सांगणे त्यावर आधारित TESTMOJ  मध्ये केलेल्या घटकावर आधारित आधारित गृहपाठ  चाचणी तयार करून  लिंक द्वारे आमच्या शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे सर्व विद्यार्थ्यांची शेअर करतो पुढे दुसऱ्या दिवशी त्यात गृहपाठ चाचणी मुलांनी कशी सोडवली त्यांचा निकाल सुद्धा ग्रुप वर शेअर करतो यातून विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धात्मक जिज्ञासा निर्माण झाली आणि विद्यार्थी स्वतः त्यांनी या झूम मिटिंग सहभागी होतात.अभ्यासमाला व दीक्षा चा या परिस्थिती मध्ये खूप उपयोग होत आहे धन्यवाद. 

साधन व्यक्ती,मा.शिंदें मॅडम,यांची वेळी वेळी भेट देऊन मुलांना मार्गदर्शन करत आहेत, तसेच मोलाचे सहकार्य  शालेय समिती अध्यक्ष दीपक मालघन व इतर सर्व सदस्य, लिखीत पिंपरी पालकाचे मिळाले आहे. 

           लेखन :
ढाकरे मंताजी शामराव 
मुख्याध्यापक 
जि प प्रा शा लिखीत पिंपरी

छायाचित्रे:


व्हिडीओ :  Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com