15 May, 2020

Digital शिक्षण - कविता

Digital शिक्षण


संकट खुप आले आहे द्वारी 
सुट्टी असेल शाळांना जरी,
सुरुच आहे गुणवत्तेची तयारी 
Digital शिक्षनाची मजाच न्यारी ll १ll


 चिमुकल्यांचा घेऊन ध्यास 
तंत्रज्ञानाची धरुनी कास, 
पालकांचा न करता भ्रमनिरास 
शिक्षक साधत आहे शैक्षणिक विकास ll 2 ll


शिक्षक,विद्यार्थी  करत आहेत
Diksha app चा वापर, 
त्या मुले आज होतोय 
जागोजागी शिक्षनाचा जागर ll 3 ll


Link,video,WhatsApp द्वारे
 शिक्षक घेत आहेत परिश्रम सारे,
 वाहण्या नेहमी शिक्षणाचे वारे
 सध्या mobile च आहे साधन खरे   ll4 ll


पालक-विद्यार्थी,शिक्षक -अधिकारी
सारेच आहे शिक्षणाचे कैवारी,
 या संकटाच्या काळातच द्वारी
आली digital ची संधी खरी   ll 5 ll


 गुणवत्तेचाच आम्हा ध्यास
 असेल जरी शेवटचा श्वास,
 प्रयत्नरत राहू सदा खास
 Digital चा आम्हा दुर्दम्य विश्वास  ll6 ll

श्री. विवेक विनायक कुलकर्णी
जि. प. प्रा. शा. आवलगाव ( बू) 
ता. घनसावंगी, जि. जालना

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com