09 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा -1कें. प्रा.शा. ताडहादगाव ता.अंबड. जि.जालना.


वर्ग - 2 रा [ अ ]      एकूण पटसंख्या : मुले १६ + मुली १९ = ३५


                अभ्यासमाला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त व छान असा उपक्रम आहे.विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासमालेतून खूप काही शिकायले मिळते.तंत्रज्ञानाची ओळख होते .माझ्या वर्गातील पालकांचा ग्रुप तयार केलेला आहे .रोजच केंद्रप्रमुख साहेब आमच्या केंद्राच्या ग्रुपवर रोजची अभ्यासमाला टाकतात.व लगेच मी पालकाच्या ग्रुपवरती ती अभ्यासमाला टाकतो.नंतर पालक आपल्या वेळेनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात. मुलेही ही अभ्यासमाला आवडीने सोडवतात.
              काही मुले तर ,अभ्यासमाला टाकण्यास मला जर उशीर झाला तर फोन करतात व म्हणतात सर, आजची अभ्यासमाला टाका.हे पाहून मलाही आनंद होतो व मी उत्साहाने कामाला लागतो.एकंदरीत रोजची अभ्यासमाला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खूपच छान उपक्रम आहे.यासाठी थोडयाफार अडचणी पण येतात.
काही पालकाकडे अँनड्राईड मोबाईल नाहीत.रेंजची अडचण, नेट पॅक नसणे. अशा थोडया फार अडचणी आहेत.
              तरी पण या सर्व अडचणीवर मात करून माझ्या वर्गातील काही मुले रोजची अभ्यासमाला मोठ्या उत्साहाने, आनंदीत होऊन सोडवतात.


वर्गशिक्षक : श्री.जोंधळे डी.डी.

केंद्रप्रमुख : श्री. संजय सोनुने 


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com