12 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा-६जि.प.प्रा.शाळा,चनेगाव केंद्र-चिखली ता.बदनापूर जि. जालना


           शाळेत आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री. कडेलवार साहेब,विस्तार अधिकारी श्री जनबंधु साहेब यांच्या प्रेरणेने व डायटचे आयटी तज्ज्ञ श्री निहाळ सर यांचे मार्गदशनातून सहशिक्षक श्री फुंदे उद्धव यांनी वर्ग पाचवी ते आठवीच्या 120 पालकांचा एक whatsaap ग्रुप तयार करून त्याद्वारे मुलांना रोज अभ्यासमाला दिल्या जातात.तसेच रोज एक तास पुरेल एवठा अभ्यास द्यायला सुरुवात केली आहे.हा अभ्यास या मुलांचा वयोगट लक्ष्यात घेऊन सामायिक असतो .अभ्यासाचा रोज विषय वेगळा असतो. 
उदा.जालना जिल्हा ,महाराष्ट्र राज्य,भारत देश ,जग,सूर्यमाला या वर रोज एक नकाशा काढणे व त्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न.मुले ते सोडवून ग्रुपवर शेअर करत होते.
           श्री .फुंदे यांनी गूगल फॉर्म च्या साह्याने मुलांना चाचण्या द्यायला सुरुवात केली आहे.त्यांनी स्वतः वेगवेगळ्या चाचण्या तयार करून मुलाकडून सोडवून घेतल्या आहेत.

चाचणीच्या लिंक:
https://forms.gle/Xv3PtjSd5vxKmEjM6https://forms.gle/vzDANsdKSXk7grf66

https://forms.gle/Qw7HeQEDqMjZBKMw9https://forms.gle/AFEXjaKRve1zyYDW9 
   
         या प्रत्येक चाचण्या 150 पेक्ष्या जास्त मुलांनी सोडवल्या आहेत.मुलांची आवड पाहून यापुढे ते तीस गुणांची गणित ,इंग्रजी ,व विज्ञान विषयाची एकत्रित टेस्ट जि मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत असेल वर्गानुसार आयोजित करणार आहेत.
        त्यांनी एक youtube channel तयार करून याद्वारे अभ्यास,अभ्यासाचे महत्व ,तो का करावा?,कसा करावा?याविषयी मार्गदर्शन ते विध्यार्थ्यांना केले आहे..youtube वर व्यक्तिमत्व विकास,NMMS व scholarship ,यांचे मार्गदर्शन करण्याचा मानस आहे. मुख्याध्यापक श्री .थोरात सर यांचे मार्गदर्शन लाभले.

 वर्गशिक्षक:                                     
 श्री. फुंदे उद्धव दत्तू
 प्रा.शा.चनेगाव केंद्र चिखली ता.बदनापूर
  मो.क्र.7972568955

साधनव्यक्ती :
श्री.चंद्रकांत गोल्डे

 केंद्रप्रमुख:
श्री.ढाकणे 


छायाचित्रे :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com