12 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा -५

जि.प.उच्च प्रा.शाळा देवगाव(ख) केंद्र ढोकसाळ ता.मंठा

वर्ग- १ ते ८ 
पटसंख्या -१९० 


          अचानक कोरोना-19 व्हायरस चे आगमन झाले आणि सर्व काही स्तब्ध झाले. शाळा बंद झाल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची ताटातूट झाली.परत शाळा कधी सुरू होईल याची पुसटशी ही कल्पना नाही. शिक्षकच ते विद्यार्थ्यां पासून जास्त काळ कसा दूर राहू शकतीळ मग काय अशा परिस्थितीत ही विद्यार्थ्यां जवळ जाण्याचा पर्याय शोधला गेला. 
           पालकांचा एक whatsapp ग्रुप बनविला शक्य होतील तेव्हडे नंबर add केले आणि सुरू झाला रोजच्या अभ्यासाचा प्रवास. रोज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर 10 प्रश्न देऊन त्यांच्या कडून उत्तरे स्वीकारल्या जाऊ लागली. त्यांचे गुण त्यांना कळले की आपले कुठे चुकले याचा विद्यार्थी शोध घेऊ लागले. स्व अध्ययनाची आवड निर्माण झाली.विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून पालकांच्या मदतीने Diksha app विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतले. Youtube सारख्या तंत्रज्ञानाचा ही उपयोग झाला.
            आता तर रोज अभ्यासमाला वेगवेगळ्या ग्रुपवर येतात त्याचा ही विद्यार्थ्यांना खूप उपयोग होत आहे विद्यार्थी आवडीने अभ्यासमाला चा उपयोग करतात. यात थोडया बहुत अडचणी येत आहेत जसे नेटवर्क प्रॉब्लेम, जास्तीत जास्त पालकांकडे android मोबाईल नसणे, नेट पॅक संपणे काही पालकांची उदासीनता तरीही या अडचणी वर मात करून मुले अभ्यासमाला सोडवितात.अभ्यासमाला उपक्रम खूप छान आहे फक्त सर्वांचे सहकार्य हवे.
शाळा जरी बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू आहे तेही तंत्रज्ञानाच्या मदतीने व मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने.


वर्गशिक्षक :
श्री.ताजने उमेशचंद्र छगनराव व सहकारी शिक्षक

साधनव्यक्ती :
श्री.अभिमान बायस 
केंद्रप्रमुख :
श्री.कैलास मुळे 


छायाचित्रे :

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com