11 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - ३जि.प.के.प्रा.शा.जळगाव सपकाळ,ता.भोकरदन जि.जालना


वर्ग 1 ते 8
एकूण पटसंख्या 479


         खर तर आमच्या शाळेची अभ्यासमाला यशोगाथा 26 मार्चपासूनच सुरू झाली.अचानक लॉकडाउन सुरू झाला आणि द्वितीय सत्राचा राहिलेला अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा असा प्रश्न आम्हा शिक्षकांसमोर उभा राहिला.DIET Jalna येथून zoom संदर्भात प्रशिक्षण घेतलेले होतेच.आम्ही जून पासूनच पालकांचे whatsapp ग्रुप बनवलेले होते.पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने झूम अँप घेऊन अध्यापनाला सुरुवात करून द्वितीय सत्राचा अभ्यास पूर्ण केला.
      वरिष्ठांच्या सुचनेनंतर विद्यार्थ्यांना सांगून दीक्षा अँप घेतले ते वापरावे कसे हेही पालकांना,विद्यार्थ्यांना सांगितले.online अभ्यासासोबतच आपल्या जिल्ह्यांनी घेतलेली चाचणी क्र.1 व 2 ला विद्यार्थ्यांसह पालकांचा ही प्रतिसाद मिळाला.
        राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून प्राप्त होणारी अभ्यासमाला आम्ही नियमित whatsapp ग्रुप वर टाकत आहो.मुले स्वतःहून शिकत असून दीक्षा अँप,qr code व youtube ची मदत गंगेत आहे.दीक्षा अँप वर एखादा घटक कसा शोधावा हेही आम्ही मुलांना सांगितले आहे.काही विद्यार्थी तर स्वयंस्फूर्तीने ग्रुप वर चर्चा करतात.गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग ही एकमेकांना करतात.हे सर्व खरे असतांना ही मात्र अनेक मुलांच्या पालकांकडे android mobile नसल्यामुळे बहुसंख्य मुले इच्छा असूनही या शिक्षण पद्धती त सहभागी होत नाही हे ही विसरून चालणार नाही.

      आमच्या शाळेने बाबासाहेबांची जयंती ऑनलाईन साजरी केली होती हा ही अनुभव आमच्या विद्यार्थ्यांसाठी नवा होता.तसेच online निकाल जाहीर करून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला गुणपत्रिका त्यांच्या मोबाईल वर दिली ते पाहून ही विद्यार्थी आनंदी झाले.
असो,धन्यवाद!


वर्गशिक्षक :
अशोक आराक
जि.प.के.प्रा.शा.जळगाव सपकाळ

साधनव्यक्ती :
संदीप देशमुख 
केंद्र - जळगाव सपकाळ

केंद्रप्रमुख :
भरत सपकाळ 
केंद्र - जळगाव सपकाळ


छायाचित्रे :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com