13 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - ८जि. प. उच्च प्रा. शाळा नळविहिरा केंद्र: कुंभारझरी ता.जाफराबाद


 पटसंख्या:- 205
 वर्ग 1ली ते 8 वी


            शिक्षण ही नियमित व सातत्यपूर्ण पद्धतीने चालणारी प्रक्रिया आहे. कोणत्याही गोष्टीचा नियमित आणि सातत्यपूर्ण सराव केला की त्या गोष्टींमध्ये निपुनता येते व ध्येय साध्य करण्यासाठी मार्ग सुलभ होतो. पण शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन व मार्गदर्शन या प्रक्रियेमध्ये खंड पडला तर त्याचा परिणाम गुणवत्तेवर नक्की होऊ शकतो अशी शक्यता कोविड19 ह्या संसर्गामुळे निर्माण झाली होती.अगदी विद्यार्थ्यांच्या संपादणूक बघण्याच्या काळातच कोविड 19 चे संकट आले. त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या तेंव्हा ह्या अडचणींवर सुद्धा मात करता येऊ शकते या साठी DIET JALNA येथील आमचे मार्गदर्शक श्री डॉ सतीश सातव सर, नारायण पिंपळे सर, व दादाभाऊ जगदाळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून तंत्रज्ञानाचा उपयोग करून यावर मात करता येऊ शकते याविषयी वेळोवेळी सविस्तर मार्गदर्शन व सहकार्य केले .
        पहिल्यांदा फक्त शैक्षणिक  वर्षाच्या सुरुवातीला मी (श्री.सावता भगवानराव तिडके) माझ्या वर्गाचा पालकांचा व्हाट्सएप ग्रुप बनवला होता त्याचा फायदा मला ह्या सद्यस्थितीत खूप झाला.मात्र वरील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली फक्त मी व्हाट्सएप ग्रुपवर अवलंबुन न राहता Google form, Testmoze app, Diksha app, Bolo app व प्रत्येक इयत्ता निहाय play store वरून अभ्यासमित्र app , zoom meeting चा वापर करून #Learning from Home हा उपक्रम यशस्वीपणे राबवित आहे.
          गावातील पालकांचा माझ्या वर्गाचा व्हाट्सएप ग्रुप सुरूवातीलाच असल्यामुळे इतर इयत्तनिहाय ग्रुप तयार करण्यासाठी इतर शिक्षक सहकारी आणि शालेय समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांची मदत मिळाली. यात काही उणीव राहू नये म्हणून केंद्रप्रमुख श्री आर यु बनकर सर यांना ह्या गटात सामील करून घेण्यात आले त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य खूप मोलाचे ठरत आहे.पालक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून गटात अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे.
        दररोज विद्या प्राधिकरण पुणे ,कडून दिल्या जाणारी अभ्यासमाला अतिशय उपयुक्त ठरत आहे.आम्ही शिक्षक आणि पालक ,विद्यार्थी DIET JALNA APP चा वापर करीत आहोत.अभ्यासमाला विद्यार्थी आनंदाने सोडवतात व त्यावर अभ्यास करतात. 
         ह्या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत Diksha app शिवाय रोजचा अभ्यास व्हाट्सएप ग्रुपवर इयत्ता निहाय टाकण्यात येतो. यामध्ये दर पाच दिवसाला झालेल्या घटकावर ऑनलाईन टेस्ट घेन्यात येते.इंग्रजी वाचन लेखन यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे.विविध गणित घटकांचे आकलन होण्यासाठी दर्जेदार व्हिडीओ ग्रुपवर टाकून शंका निरसन करण्यात येते. 1मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ऑनलाईन भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी अनेक घटकावर पालकांच्या साह्याने व्हिडिओ बनवून ग्रुपवर शेयर करतात यासाठी शाळेचे "आपली शाळा आपली मुलं" हे youtube चॅनेल ची निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे.
        ह्या उपक्रमाअंतर्गत साधनव्यक्ती श्री. नारायण पिंपळे सर यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या सोबत व्हिडिओ कॉल द्वारे मार्गदर्शन केले त्यात Diksha app, Bolo app, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

 DIET JALNA, तालुका शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली #Learning From Home हा उपक्रम यशस्वी होत आहे याचा आनंद आहे.

 सर्वांचे मनस्वी आभार!!!


 शिक्षक:-
 श्री सावता भगवानराव तिडके

सहकार्य:-
श्री मुनेमाणिक डी आर
श्री नागरे के एस
श्री जाधव बी एस
श्रीमती खलसे एस एल
श्री कळंबे पी एन
श्री बकातकार एम पी

 साधनव्यक्ती:-
 श्री नारायण पिंपळे सर

 केंद्रप्रमुख:-
 श्री आर यु बनकर सरछायाचित्रे :-


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com