12 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा-७

जि.प.प्रा.शा.पारेगाव कें. मानेगाव ता.जि.जालना


            अचानकपणे आलेल्या या जागतिक महामारी covid-19 मुळे संपूर्ण राज्यात व देशात lockdown असल्यामुळे मुलांचा  त्यांच्या प्रश्नोत्तराचा सराव testmoz च्या साहाय्याने करून घेतला.त्यानंतर जिल्हा परिषद जालना ऑनलाईन चाचणी तसेच SCERT द्वारे मा संचालक दिनकर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून दररोज अभ्यासमाला   सुरू करण्यात आल्या आम्ही पालकांच्या मोबाईल वर लिंक पाठवून मुलांना अभ्यासमाला सोडविण्यासाठी प्रवृत्त केले अभ्यासमालेत कला कार्यानुभवाचे घटक असल्याने मुलांना आनंद मिळाला मुलांनी ते पाहून विविध वस्तू सुद्धा तयार केल्या पालकांना देखील आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या मुलांसारखी मोबाईल वर अभ्यास करतात हे पाहून समाधान वाटू लागले.
         सुरुवातीला lockdown मुळे रिकामी असलेली मुले या उपक्रमामुळे आनंदी झाली व त्यांच्यात अभ्यासाची चढाओढ लागली.४थी च्या वर्गाचा वर्गशिक्षक असल्यामुळे व lockdown कालावधी पुढे अनिच्छित असल्याने मुलांचा नवोदय व शिष्यवृत्ती तयारीसाठी मुलांचा जो अगोदर केलेला WhatsApp group वर दररोज चा अभ्यास देऊन त्याचा सराव घेता आला.या कामासाठी मुलांचे पालकांनीही खुप सहकार्य केलं.ते शेतीच्या कामा तून वेळ काढून ग्रुप वर दिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी मदत करत होते.जे पालक निरुत्साही होते त्यांना देखील वारंवार फोन करून सहभागी करून घेण्या चा प्रयत्न केला.
            सदर online test सोडवताना मुलांना खूप उत्सुकता व आनंद होत असल्याचे लक्षात आले.कारण मुले स्वतः फोन करून पुढची test कधी आहे याची विचारणा करत आहे.
 या कामासाठी विस्तार अधिकारी श्रीमती नाकाडे मॅडम,के. प्र.श्री देशमुख सर,मु.अ.श्री चौधरी सर व विशेष असे पालकांचे सहकार्य मिळाले.वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक व इतर अडचानिसाठी के.प्र.श्री अरुण देशमुख सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

वर्गशिक्षक-
श्री आप्पासाहेब मुळे

साधनव्यक्ती-
श्री.प्रफुल्ल राजे 

केंद्रप्रमुख-
श्री अरुण देशमुख 

छयाचित्रे :
  

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com