28 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - ३०


जि.प.कें.प्रा.शाळा,राजूर  केंद्र : राजूर तालुका : भोकरदन


          मी श्रीमती प्रफुल्लता बळीराम भिंगोल (प्रा.प.) केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर .सर्वप्रथम मी येथे नमूद करू इच्छितो की मा.शालेय शिक्षण मंत्री वर्षताई गायकवाड यांच्या प्रेरणेतून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत सुरू केलेल्या या उपक्रमाचं माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात स्वागत केलं आहे. कारण मी मागील दोन वर्षांपासून माझी मुले माझी शाळा या वर्गाच्या व्हॉट्स ऍप ग्रुपच्या मध्यामतून विद्यार्थ्यांना घरी अभ्यास देत होते. त्यात आणखी भर म्हणजे ही अभ्यासमाला व दीक्षा ऍप चे  माध्यमाद्वारे माझे विद्यार्थी खरोखर अभ्यास एन्जॉय करत आहेत.

         इतके दिवस ऑनलाईन टेस्ट व अभ्यास दररोज केला जायचा आणि आता ज्या लिंक येत आहेत की अवांतर वाचन, चित्रकला, English, मजेत शिकूया विज्ञान यातून अमृता सोनवणे या विद्यार्थिनीने कोरोनवर एक कविता केलीय ती Corona वॉरियर्स ची भूमिका बजावते.तसेच निशा डवले हिने Spoken English च्या link द्वारे रोज 50 वाक्य तयार करून ग्रुपवर पाठवत आहे. Corona बचाव संदेश चित्राच्या माध्यमातून सांगितला आहे.सौरभ मग्रे, इरफान यांनी विविध प्रयोग टाकाऊ पासून टिकाऊ मॉडेल बनवले आहे. बॅटरी वर चालणारा पंखा सौऊर्जेवर चालणारा एसी असे विविध प्रयोग करून विद्यार्थी ग्रुपवर पाठवतात.
         
 मला आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक व्हॉट्स ग्रुप  वर शिष्यवृत्तीचा अभ्यास देतात तसेच झूम ऍप द्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वर्ग चालू आहे.ज्यांच्या कडे स्मार्ट फोन नाही त्यांना मी फोन करून एक तास त्यांच्या अडचणी सोडवते.

          यासाठी मला आमचे मार्गदर्शक श्री.रमेश पुंगळे sir (केंद्रप्रमुख.), श्री.चंद्रशेखर देशमुख, BRC भोकरदन, श्री. बहेकर सर,मुख्याध्यापक, श्री.अनीलभाऊ पुंगळे, शाळा व्य.समिती अध्यक्ष.राजूर यांचे सहकार्य लाभले.


छायाचित्र :
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com