25 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २९


जि.प.उच्च प्राथ.शाळा जवखेडा (ठों) केंद्र - केदारखेडा ता.भोकरदन 

जवखेडा ठों.शाळेची स्थापना - 1956  
वर्ग - 1 ते 8 
विद्यार्थी संख्या - 235

Learning from home संदर्भात आमच्यापुढील आव्हाने-
कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे लॉक डॉऊन सुरू झाले,शाळा बंद झाल्या.शाळा बंद मग पुढे काय? या वर उपाय शोधला तो SCERT ने अभ्यासमाला सुरु करून. अभ्यासमाला तर सुरू झाली पण अडचणी निर्माण होऊ लागल्या - २०० पालकां पैकी Android मोबाईल असणारे 120, साधा मोबाईल असणारे 50 तर कोणत्याही प्रकारचा मोबाईल नसणारे 30 पालक होते. Android मोबाईल असणारे पालक मुलांना मोबाईल देत नव्हते, त्यांची कामाची वेळ आणि मुले मोबाईल मागायची.जवळ जवळ 40 % पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही ज्यांच्या कडे Android मोबाईल आहे त्यांना इंटरनेट परवडत नाही.आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही पुढील उपाययोजना केली.-

असा प्रश्न पडला तेव्हा केदारखेडा केंद्रातील टाकळीचे तंत्रस्नेही शिक्षक श्रीकांत सुरडकर सरानी मुक्तद्वार अभ्यासिका उपक्रम सुचविला. तेव्हा आम्ही केंद्रप्रमुख आर.पी. भाले यांच्या मार्गदर्शनाने मुख्याद्यापक व्ही.एन. घायाळ,स.शि.पी.व्ही.मिसाळ व शिक्षकवृंद.जवखेडा ठों.गावामध्ये तीन Learning from home /अभ्यासमाला अभ्यासिका सुरु केल्या.
1) छ.शिवाजी महाराज मुक्तद्वार अभ्यासिका (२६ विध्यार्थी)
2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तद्वार अभ्यासिका (२२ विध्यार्थी)
3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुक्तद्वार अभ्यासिका (१५ विध्यार्थीनी)

आम्ही गावातील जिज्ञासु तीन तरूणांची समन्वयक म्हणून मदत घेतली.
1) श्री.अरूण सांडू ठोंबरे
2) सुनिल राजू ठोंबरे
3) शिवाजी अंकूश ठोंबरे

अभ्यासमाला(दीक्षा अॅप)चा प्रभावी वापर- 
1) वरील तिघांनी गावातील सहज वापरता येईल अशी मोकळी जागा साफ करून घेतली (मंदिरा पुढील पटांगण, समाज मंदिराचे पटांगण)
2) मग सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यानां अभ्यासास मदत करायला सुरुवात केली.
३) विध्यार्थ्यांचे कोणताही मोबाईल नाही, ANDROID मोबाईल आहे पण नेट नाही, साधा मोबाईल आहे असे वर्गीकरण केले या साठी जाधव madam मिसाळ सर गजभिये सर दांडेकर सर शिंगणे सर्व व घोरपडे सरांनी मदत केली
४) गावातील जुने पण चालू असलेले 3G मोबाईल शोधून आणले
५) Learning from home /अभ्यासमाला  अभ्यास सुकर व्हावा म्हणून दिक्षा अॅप,बोलो अॅप इन्स्टॉल केले वर्गनिहाय व्हाट्सएप ग्रुप तयार केले त्या वर SCERT व  डाएट मार्फत पाठवलेल्या  अभ्यासमाला रोज पाठवल्या जात आहेत.
६) नेट साठी पालकांनी प्रत्येक दिवसाची जबादारी वाटून घेतली  व मु.अ. घायाळ सरांनी ही प्रत्येक अभ्यासिकेतील १ मोबाईल ला नेट रिचार्ज करून दिले.

प्रत्यक्ष परिणाम-
अँड्रॉइड मोबाईल नसलेले मुले नेट नसलेले मुले आणि साधा मोबाइल असलेले मुले सामाजिक अंतर ठेवून एकत्र येऊन  दीक्षा ॲप, SCERT महाराष्ट्र चे शाळा बंद... पण शिक्षण आहे - अभ्यासमाला, आयटी विभाग ,DIET जालना यांचे मार्गदर्शन व लिंक्सचा अभ्यास करत आहेत.

 इयत्ता पहिली चे मुले नियमित वाचन करत आहेत. इयत्ता २ ते ८ वी चे मुले इंग्रजी सह सर्वच विषयांचे स्वयं अध्ययन करत आहेत. इयता ५ वी चे २६ पैकी २० तर  ८ वी चे ३४ पैकी १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करत आहेत.

कला कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यासाठी असलेल्या पाठ्यघटकाचे मार्गदर्शन प्रत्यक्ष मिळत असल्याने जे विषय फक्त वेळापत्रकात होते ते प्रात्यक्षिकासह मुले करत आहे.

या सर्व गोष्टीमुळे परिणाम असा झाला की गृपवर आलेला अभ्यास पं.स. चे चंद्रशेखर देशमुख यांनी मु अ यांना What's up वर दिलेल्या प्रश्नपत्रिका व अभ्यास सोडविण्यास खूपच मदत झाली.मुले सहज प्रश्नपत्रिका सोडवू लागली.निरनिराळे pdf शोधून पुस्तके वाचन्याची गोडी लागून त्यांच्यात उत्सूकता वाढीस लागली. 

मिस्ड कॉल देऊन गोष्टी ऐकू लागली आहेत. इ.5, 8 शिष्यवृत्ती अभ्यास करू लागली. पालकानांही समाधान वाटले त्यांची ही खुप मदत झाली.

काही विद्यार्थी असे आहे की शाळा त्यांच्या What's up वर अभ्यास टाकायच्या आधीच सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीन शॉट टाकत आहेत यामधे शुभम संतोष सहाणे,अर्जुन दत्तू ठोंबरे,बाबासाहेब लक्ष्मण घोडे, सुमेध संजय शिंगणे आदी आघाडीवर असतात. मुलेच स्वतः Whats appवर अभ्यास प्रश्न व इतर अभ्यास शोधण्याचे कौशल्य प्राप्त झाले  मुलांना स्वयमं अध्ययनाची गोडी लागू लागली.श्री.घायाळ व्ही.एन.(मुख्याध्यापक ) व सर्व शिक्षक 
जि.प.उच्च प्राथ.शाळा जवखेडा (ठों) केंद्र - केदारखेडा ता.भोकरदन 

मार्गदर्शक -
श्री.आर.पी. भाले (केंद्रप्रमुख)
श्री. चंद्रशेखर देशमुख (साधनव्यक्ती)

छायाचित्रे -


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com