25 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २८


 जि. प. कें. प्रा. शाळा  वाघरुळ, ता. जि. जालना


               लॉक डाऊनमुळे शाळेला अचानक सुट्टी दिली आणि विद्यार्थी व शिक्षकांची अध्यापनाची प्रक्रिया खंडित झाली .मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये उपचारात्मक सराव, स्पर्धा परीक्षेची तयारी या सर्व गोष्टी घेण्याचे चौथीचे वर्गशिक्षिका मी ठरवले होते आता तो अभ्यास कसा करून घ्यावा हा प्रश्नच होता ,त्यासाठी केंद्रप्रमुख चित्ते सरांनी बनवलेला शाळा व गावकरी शाळा  व्हाट्सअप ग्रुप ची खूप मदत झाली.

           मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यावर अभ्यास टाकला सर्वच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता त्यामुळे ज्या मित्र मैत्रिणीकडे अभ्यास येतो त्याच्या घरी जाऊन अभ्यास करा त्याच्याकडे मोबाईल नाही त्याला तुमच्या घरी बोलू नाना याप्रकारे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडला ग्रुप वर ही टाकला.

                 बऱ्याच विद्याथ्र्यांना दिक्षा अॅप व बोलो अॅप या आधीच डाऊनलोड करून दिले होते .विदयार्था बोलो अॅपचा स्वतंत्रपणे वापरही करतात . त्यावरील भाषिक खेळही खेळतात.

                  त्यानंतर माननीय सीईओ मॅडम यांच्या आदेशानुसार वर्गनिहाय चाचणी घेण्यासाठी आम्ही वर्गाचा ग्रुप केला यामध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता त्यामुळे चाचणी सोडण्यासाठी शेजारच्या मित्र मैत्रिणीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी चाचणी सोडून ऑनलाईन चाचणी सोडल्याचा आनंद पालक व विद्यार्थ्यांना झाला. प्रथम चाचणी ९६% तर दुसरी चाचणी १०० % विदयार्थांनी सोडवली.

                 आता विद्यार्थी कोरोना योद्धा पुस्तक पुस्तक बनवत आहेत,इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा साठी येणारे दीक्षा ॲप वरील उदाहरणे व सराव करत आहेत. अभ्यासमालेवरील आधारीत वस्तुनिष्ठ प्रश्न सराव आम्ही चौथीचे वर्ग शिक्षक ग्रुपवर टाकतो. विद्यार्थी घटकावर आधारित अतिरिक्त प्रश्न सोडवतात.

           या ग्रुपच्या माध्यमातुन मी एक वर्क फ्रॉम होम विडिओ ही बनवला आहे.अशा प्रकारे कोरोना योद्धा पुस्तक, बोलो अॅपचा वापर , दिक्षा अॅपवरील इ. 5 वी शिष्यवृत्ती पूर्वतयारी इ. अभ्यास मालेतील उपक्रमांद्वारे आम्ही विदयार्थी व शिक्षक यांची आंतरक्रिया सुरू ठेवली आहे. यात पालकांचे महत्वाचे योगदान आहे. हे सर्व अभ्यास मालेमुळेच शक्य झाले . धन्यवाद!मार्गदर्शक -

श्री. चित्ते व्ही.एस. (केंद्रप्रमुख, वाघरुळ)
श्री. छगन जाधव  (साधनव्यक्ती)
श्री. पवार पी .डी. ( मुख्याध्यापक)


वर्गशिक्षिका :
श्रीम.आर. डी. नलावडे ( ४था - ब)
जि.प.कें.प्रा .शा वाघरुळ,ता. जि.जालना.
छायाचित्रे:


घरी रहा, सुरक्षित रहा - विद्यार्थी व्हिडीओ 


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com