23 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २७


जि.प.प्रा.शा तपोवन तांडा केंद्र-राजुर ( ग ) , ता. भोकरदन


वर्ग-  ३ रा 
वर्गशिक्षक - श्री. संतोष त्रिंबकराव खांडेभराड

          आदरणीय श्री भाऊसाहेब काकडे साहेब( राज्य समन्वयक गणित विषय) व आदरणीय केंद्रप्रमुख श्री रमेश पुंगळे साहेब  यांचा नेहमीच आग्रह असायचा की , शाळा आणि पालक यांच्यामध्ये नेहमीच संपर्क असला पाहिजे,सलोख्याचे संबंध असले पाहिजे. या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुप स्थापन केल्यास आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती, विद्यार्थांची अभ्यासातील प्रगती पालकांपर्यंत पोहोचवता येते. मुख्याध्यापक या नात्याने मी शाळा व गावकरी व्हाट्सअप ग्रुप आधीच तयार केला होता.
       जि.प. प्रा. शा. तपोवन तांडा या ठिकाणी  इयत्ता तिसरी वर्गाचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून मी त्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून रोजच्या रोज विविध घटकांवर आधारित प्रश्न काढून देतो. पालकांना दीक्षा ॲप वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले, त्यांना ॲप वापर करताना येणाऱ्या अडचणी मध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच शाळा बंद पण शिक्षण चालू आहे ही अभ्यासमाला रोजच्या रोज पाठवण्यात येते. तसेच पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ मधील विविध घटक व्हाट्सअप ग्रुप वर वेळोवेळी पाठवण्यात येतात मुलेही आनंदाने सहभागी होतात, सोडवलेला अभ्यास ग्रुप वर टाकतात, फोन करुन सांगतात.आपली मुले ऑनलाइन अभ्यास करत आहेत, चाचणी सोडवत आहेत याचे तांडयातील पालकांना अप्रुप वाटते. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम श्रीमती निमा अरोरा मॅडम यांच्या संकल्पनेतून झालेल्या दोन्ही ऑनलाईन चाचण्यांमध्ये इयत्ता 3 री वर्गातील विदयार्थ्यांनी 100% सहभाग नोंदविला.
       
    सामाजिक उपक्रम: माझ्या बालमित्रांच्या सहकार्याने शाळेतील सर्वच मुलांना शुज सॉक्स, वहया, पेन, पेन्सिल व काही गरजुना स्कुल बॅगचे वाटप माझ्या बालमित्र व्हाट्सअप ग्रुप तर्फे करण्यात आले.
        
  वाढदिवसाची भेट: वाढदिवसाच्या निमिताने शाळेतील मुलांना क्रिडा साहित्य, खाऊ, कंपासपेटी शालेय साहित्य याचे वाटप करण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम मी माझ्या शाळेत राबविला.
        
  वैज्ञानिक दृष्टिकोन: सूर्यग्रहणाच्या निमित्ताने मुलांमधले गैरसमज व अंधश्रद्धा याचे निरसन प्रात्यक्षिकाव्दारे live सूर्यग्रहण e class मध्ये दाखवुन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला. असे उपक्रम नेहमीच शाळेत होतात.

व्हॉटस अप ग्रुपच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांशी पालकांशी एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. या अनुषंगाने एवढेच म्हणता येईल की "अपना अस्तित्व बनाये रखना है तो परिवर्तन बेहद जरूरी है" चला मग आधुनिकतेची कास घेऊ धरूया सारे शिकूया पुढे जाऊया शाळा बंद पण शिक्षण खरंच सुरू आहे .
आपल्या अभ्यासमालेमुळे , धन्यवाद!


मार्गदर्शन-
श्री भाऊसाहेब काकडे ( गणित विषय राज्य समन्वयक)
श्री आर.व्ही.पुंगळे सर (केंद्रप्रमुख, राजूर)
श्री.चंद्रशेखर देशमुख सर(साधनव्यक्ती)

सहकार्य-
श्रीमती यदमाळ यू.ए.
श्रीमती बूजाडे बी.आर.

वर्गशिक्षक व मुख्याध्यापक:
श्री संतोष त्रिंबकराव खांडेभराड
स.शि.(मुख्याध्यापक)
जि.प.प्रा.शा.तपोवन तांडा कें राजूर
ता.भोकरदन जि.जालना

छायाचित्रे :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com