22 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २६


समुह साधन केंद्र रोहिलागड, ता.अंबड               अचानक दिनांक 17 मार्च 2020 रोजी शाळा बंद ठेवण्याचा मा.बीईओ साहेंबाचा आदेश आला आणि मी (श्रीमंत सुखदेव गंगावणे केंद्रप्रमुख .रोहिलागड ता.अंबड ) तर अचंबित झालो...!!! कारण होते कोव्हीड 19..! हळुहळू समजायला लागले कि जगाबरोबर भारतातही व आपल्या परिसरात कोरोणाने शिरकाव केल्याचे...!  कारण माझा मुख्याध्यापक शिक्षक  विद्यार्थी पालक गाव समाज यांच्याशी तुटलेला  नाते संबंधतला मनाला दूखद भाव खुप दुरावा निर्माण  करायला लागला होता. एकुण 14 खाजगी व जि.प शाळेतील 105 शिक्षक मुख्याध्यापक व 1778 विद्यार्थी पासून मला दुर व्हावे लागले होते म्हणून मनात सतत रुकरुक लागत होते. परंतु अशातच मा. संचालक दिनकर पाटील एस.सी.ई.आर.टी. पुणे यांच्या आदेशान्वये मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे डायट जालना यांच्या मार्गदर्शना नुसार दीक्षा ॲप व त्यावरील अँक्शन विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यातील  नाते संबंध पालकांमध्ये वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठेवण्यास म्हणून शाळा बंद ...पण शिक्षण आहे.... ही मालिका समोर आली.
             विविध विषयांवर वर्गवार सहशालेय कृतीयुक्त उपक्रम विद्यार्थी शिक्षकांच्या व पालकांच्या बुद्धीला चालना देणारी मालिका वाटली. प्रथम हे सुरू असतांनाच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा मॅडम यांच्या आदेशान्वये ऑनलाइन परीक्षा व शिष्यवृत्ती धरतीवर चाचणी केंद्रातील सर्व शाळांमध्ये वर्गनिहाय प्रत्येक वर्गाचे  70 व्हाट्सअप ग्रुप करण्यात आले. मीही त्यात माझ्या केंद्राचे 5 व्हाट्सअप ग्रुप तयार करून माननीय बीईओ विपुल भागवत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ही अभ्यासमाला घरबसल्या मु.अ व शिक्षकांडुन पालकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत राहिलो.
               मालिका नुसार माझ्यासह सर्व मु.अ शिक्षक विद्यार्थ्यांना दररोज स्वाध्याय गृहपाठ मालिकातील सह उपक्रम प्रकल्प व्हिडिओ गाणी ऑडिओ मनोरंजनात्मक खेळ ताल युक्त कृतीयुक्त इंग्रजी मराठी नानाविविध सहशालेय उपक्रम ऍक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांना देत आहोत त्याची पडताळणी करण्यासाठी केलेल्या व्हाट्सअप ग्रुप मार्फत विद्यार्थी प्रत्येक मु.अ व शिक्षकांकडे दररोज केलेला अभ्यास व्हाट्सअप वर तपासण्यासाठी पाठवत आहे.त्यांना दररोज स्वाध्याय देत आहे त्यातून दीक्षा ॲप मधील शालेय कृतीयुक्त उपक्रम उपयोजनात्मक वाटत आहे त्यामुळे ती विद्यार्थ्यापर्यंत रंजक रोचक  मनोरंजक कृतीयुक्त भावयुक्त व विद्यार्थी बुद्धीला चालना देणारे वाटते त्यामुळे ते विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही खूप आवडले पालकांनीही खूप प्रतिसाद दिला आहे व माझ्या केंद्रातील एकूण 1778 विद्यार्थ्यांपैकी 1200 विद्यार्थी-पालकांपर्यत ही मालिका पोहोचण्यात यशस्वी झालो. 
             माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने ऑनलाइन परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा व अन्य उपक्रम पोहोचण्यास मदत झाली आहे हे सर्व मालिक भाग 1 ते 39  निरंतरपणे चालू असून याचा  माझ्यासह केंद्रातील मु.अ व शिक्षकांपर्यत विद्यार्थ्यांना पालकांना खुप खुप भरीव लाभ झाला...त्याची काही क्षणचित्रे मी ह्या सोबत पाठवत आहे आमचे आदरणीय बीईओ विपुल भागवत यांनी खूप खूप अडचणीवर मात करण्यास आम्हास मार्गदर्शन केले व सर्व पालकांना विद्यार्थ्यांपर्यंत ही मालिका दीक्षा ॲप द्वारे मदत झाली या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात व विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये या दीक्षा चा उपयोग निरंतरपणे डाउनलोड ऍप्लिकेशन मार्फत ई पुस्तके प्राप्त झाली व विद्यार्थी आता स्वयंपणे ती अभ्यासात मग्न असून दिवसातून माझ्यासह सर्व मु.अ शिक्षकांना हे फोन करून अडचणी विचारतात. 
              माझ्यासह मु.अ व सर्व शिक्षक त्यांना त्या अडचणी सहानुभूती पुर्वक समजावितो सोडतात यासाठी दिक्षा अँप बरोबरच व्हाट्सअप ग्रुप मा.बीईओचे मार्गदर्शन व डायट जालनाची वेळोवेळीची मदत विशेषतः आयटी विभागाचे विषय सहाय्यक  श्रीकृष्ण निहाळ यांचे अनमोल मार्गदर्शन व मदत सहकार्य ही तितकाच पूरक ठरला आहे. आपण सर्व मिळून निश्चित आलेल्या या आपत्कालीन कोरोना नैसर्गिक संकटावर आपणाद्वारे केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवू...!!....सर्वांचे आभारी !!!

केंद्रप्रमुख- 

श्री. गंगावणे श्रीमंत सुखदेव, समुह साधन केंद्र रोहिलागड, ता.अंबड 

मार्गदर्शक-

श्री. विपुल भागवत, गटशिक्षणाधिकारी , प.स.अंबड

छायाचित्रे:Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com