21 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २५जि.प.कें.प्रा.शाळा केंधळी, ता.मंठा  


वर्ग - १ ते ७. 
पटसंख्या - २७०


               कोरोनाच्या जागतीक महामारीच्या संकटामुळे आपण सर्वच अस्वस्थ झालेलो आहोत. लॉक-डाऊन मुळे प्रत्यक्ष अध्यापन शाळेत जाऊन करणे अशक्य झालेले आहे, कारण आपल्या चिमुकल्या विद्यार्थांचा व आपल्याही सुरक्षिततेचा प्रश्न  आहे.

                  Learning is a continuous Process अध्ययन ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. तसा आमच्या विदयार्थ्यांचा संपूर्ण पाठयक्रम आम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयातच पूर्ण केलेला होता.परंतु आपले मूल्यमापन करणे आवश्यक होते.त्या साठी गुगल फार्म बनवुन काही सराव चाचण्या घेतल्या.त्या नंतर डायट जालना मार्फत च्या चाचण्या पालकांच्या वॉट्रस_अप ग्रुपवर शेअर केल्या,त्या चाचण्या साठी विदयार्थाचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला.

           तसेच दिक्षा अॅप च्या वापरा बाबत मागील सत्रा पासूनच  आग्रही धोरण ठेवलेले आहे.पालकांना मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन दिलेले आहेत.तसेच अभ्यासमाले अंतर्गत विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये मुलांचा सहभाग असतोच.ह्याव्यतिरिक्त कहूत अॅप घेऊन त्यावर प्रश्नमंजुषा देऊन विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्यात येतो. मुले खूप उत्साहाने सहभागी होत आहेत,तसेच स्वयंप्रेरणेने स्वयंअध्ययनही करत आहेत.त्यामुळे पालकामध्येही समाधान व्यक्त होतांना दिसते.पुढिल काळात शाळा सुरु होण्यासंबधी अनिश्चितता आसतांना निश्चितपणे ऑनलाईन अभ्यासाला विविध अॅप मुळे दिशा मिळत आहे.सहकारी- मुख्याध्यापक श्री माथणे सर,श्री टी.डी.जोशी यांचे सहकार्य मिळत आहे.
    वर्गशिक्षिका - श्रीमती जे.पी.शेवाळकर.
    साधनव्यक्ती - श्रीमती चव्हाण मॅडम.
    केंद्रप्रमुख-  श्री एन.एम गोरे


छायाचित्र :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com