20 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २४ जि.प.प्रा.शा. केहाळ वडगाव,कें.जयपूर, ता.मंठा

 वर्ग: १ ते ६
 पटसंख्या: ७३


          आज आपल्या भारत देशासह संपूर्ण जग कोरोना या व्हायरसच्या विळख्यात अडकलेले आहे, त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाला शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत.या शाळा बंद ठेवण्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सुद्धा अंतर निर्माण झाले आहे.यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने व जिल्हा प्रशिक्षण संस्था जालना यांनी उपलब्ध माहीती तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक उपक्रम राबवत ऑनलाईन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.यात महाराष्ट्र शासनाचा "शाळा बंद...पण शिक्षण आहे" व जालना जि.प.चा "ऑनलाईन चाचणी" या सारखे तसेच काही तंत्रस्नेही शिक्षक सुद्धा आपल्या परीने विविध ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत
      डायट जालना मार्फत सुद्धा अवांतर वाचन, साहित्य,कला ,खेळ,कार्यानुभव,स्पोकन इंग्लिश, संगणक विज्ञान,मजेत शिकूया विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी संदर्भात मार्गदर्शन व इतर माहिती पुरवली जात आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
      जि.प.प्रा.शा. केहाळ वडगाव येथे आम्ही सर्व शाळेतील शिक्षकांच्या मदतीने पालकांचा व गावातील शिक्षणप्रेमी मंडळींचा व्हाटस् अप ग्रुप बनवून गावातील अँड्राईड फोन आहेत अशा सर्व पालकांचे नंबर ऍड केलेलं त्यावर विद्यार्थ्यांना वरील ऑनलाईन अभ्यासाबरोबरच त्यांना दररोज अभ्यास व लेखन व इतर मार्गदर्शन केले जात आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जालना जिल्हा परिषद ने आयोजित केलेल्या ऑनलाईन परीक्षा दोन्हीही चाचण्या यशस्वीपणे राबवून जयपुर केंद्रातून  या चाचणीत ७०% विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात यासाठी पालकांनी  उत्तम प्रतिसाद दिला
     दिक्षा अॅप डायटद्वारे येणारा दररोजचा असल्यास मुलांना पाठविला जातो,तसेच काही खाजगी संकेतस्थळावरील शैक्षणिक साहित्याचा,व इतर ऑनलाईन प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा शाळेतील सर्व शिक्षकांचा प्रयत्न असतो, युट्युब वरील शैक्षणीक माहीतीच्या लिंक शाळेच्या ग्रुपवर शेअर केल्या जातात, रेडिओ दरवाजे तसेच सह्याद्री वाहिनी वरील शैक्षणीक कार्यक्रमाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे.
         आमची शाळा हि कमी उत्पन्न व मोलमजुरी करत असणाऱ्या गटातील पालकांची आहे त्यामुळे बहुतेक लोकांकडे महागडे मोबाईल नाहीत तरीसुद्धा लाॅकडाऊनमुळे विद्यार्थी व पालक प्रतिसाद देत आहेत हि आनंदाची बाब आहे लाॅकडाऊनमुळे विद्यार्थी व पालक यांना मोबाईल फोनचा सकारात्मक उपयोग व फायदा लक्षात आला आहे.तसेच आपल्याला हा शिक्षणातील नवीन बदल स्विकारावा लागेल असे सर्व पालकांचे मत बनले आहे.
          हा उपक्रम राबवताना आम्हाला आमचे गटशिक्षणाधिकारी सतिशराव शिंदे साहेब ,साधनव्यक्ती  श्री गिर्हे सर, केंद्रप्रमुख श्री प्रमोद खंडागळे सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले तसेच आमच्या शाळेतील शिक्षक सहकारी श्री चरकेवाड सर, श्री कांबळे सर यांनी सहकार्य केले.

वर्गशिक्षक: श्री दीपक देवधर भुस्कुटे
केंद्रप्रमुख: श्री प्रमोद खंडागळे 
साधनव्यक्ती: श्री संतोष गिऱ्हे 

छायाचित्र :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com