19 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २३




जि.प.प्रा.शा.पेरजापूर कें.कन्या ता.भोकरदन

वर्ग- 1 ते 7
पटसंख्या- 124


      कोरोना विषाणू मुळे अचानक शाळा बंद झाली आणि विद्यार्थी एकदम संभ्रमीत झाले की आता पुढे काय ?  संपूर्ण जगावर आणि भारतावर ओढावलेल्या कोवीड-19 विषाणूच्या संकटातून सावरतांना शाळा बंद पण शिक्षण आहे या मोहिमेअंतर्गत पालकांचे व्हॉट्स ॲप ग्रुप तयार केले. त्यावर सत्रातील राहीलेल्या अभ्यासक्रमाचे  यु टयूब वरचे विवीध व्हीडीओ शेअर केले. तसेच जिल्हा स्तरावरून पूरविण्यात आलेल्या लिंक दवारे दोन्ही चाचण्या घेतल्या. शाळा सुरू असतांना आम्ही QR कोड च्या मदतीने विद्यार्थांना पुस्तकातील संकल्पना समजावून सांगत होतो.परंतू लॉकडाऊन सुरू झाले आणि शाळा बंद झाल्या मग आमच्या समोर मोठा प्रश्न होता तो म्हणजे विद्यार्थांपर्यंत दिक्षा ॲप नेण्याचा ?  म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग मग काय गावातील पालकांची व शा. व्यवस्थापन समितीची  या साठी मदत घेण्याचे ठरविले.या पालकांशी वारंवार संपर्क साधून त्यांना दिक्षा ॲप चे महत्व पटवून दिले.व हे ॲप डाऊनलोड करण्याची संपूर्ण पध्दती एका कागदावर क्रमवार लिहून गावातील ग्रुप वर असलेल्या पालकांना व या तरुणांना फॉरवर्ड केली. आपल्या गावातील ज्या पालकांना हे ॲप डाऊनलोड करण्यात काही अडचणी येत असतील तर त्यांना मदत करण्याच्या तरुणांना मोबाईलवरुन सूचना दिल्या.
      आता दररोज अभ्यासमाला इयत्तानिहाय तयार केलेल्या ग्रुप वर पाठवून विद्यार्थी त्यांच्या सवडीनुसार सोडवत आहेत.ज्या विद्यार्थ्यांजवळ Android मोबाईल नाही ते आपल्या मीत्रा कडे /काकाकडे जावून अभ्यासमाला(सुरक्षीत अंतर ठेवून) सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.व आज जरी नेट पॅक संपला तरी रीचार्ज केल्यावर राहिलेल्या दिवसंची अभ्यासमाला नंतर एकदम टप्या टप्याने जरी सोडवली तरी चालते असे त्यांना सांगीतले आहे. व दिक्षा ॲप वरील व्हीडीओ विद्यार्थी बघत आहेत. एकंदरीत तंत्राज्ञानाच्या सहाय्याने एक वेगळया शैक्षणीक अनूभूतीची प्रचीती या चिमूरडयांना येतेय हे मात्र निश्चीत...‍             
मुख्याध्यापक
श्री पुरुषोत्तम विश्वनाथ नरोटे
सर्व सहकारी शिक्षक- श्री म्हस्के डी पी ,श्री जाधव डी एम, श्री गिरणारे जि एस व श्री जाधव के एल
दत्तू तळेकर (अध्यक्ष)शा.व्य.स.पेरजापूर
मार्गदर्शक -
साधनव्यक्ती– श्री. संतोष काकडे
केंद्रप्रमुख– श्री आर.एच .सोनवणे.

छायाचित्रे :
    

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com