19 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २२
जि.प.प्रा.शाळा आनंदवाडी, कें. बरांजळा साबळे, ता.भोकरदन


वर्ग :- 1 ते 5
पटसंख्या :- 29

       कोविड-19 च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण जग ठप्प झालेले आहे. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या एकाच उपाय म्हणजे सामाजिक सुरक्षित अंतर. त्यातच राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाला दि.17 मार्च 2020 पासून शाळा, कॉलेजेस सर्व काही बंद करावे लागले. त्यामुळे विद्यार्थी आणि अभ्यास यामध्ये अंतर वाढते कि काय, असे वाटू लागले.
       दि.17 मार्च रोजी आजपासून शाळेला सुट्टी आहे, हे विद्यार्थ्यांना सूचना सांगण्यासाठी शाळेत गेलो. सूचना सांगितल्यानंतर सर्व मुले माझ्या जवळ आली आणि सर आता शाळेला सुट्टी आहे मग आम्ही काय अभ्यास करायचा...? आम्हाला अभ्यास द्या. हे नेहमीच्या सवयी प्रमाणे मुले म्हणू लागले. मी सर्व मुलांना वहीत अभ्यास लिहून दिला.
        शाळा वस्तीवर असल्याकारणाने सर्व पालकांचे मोबाईल नंबर माझ्याकडे उपलब्ध होते. 29 पालकांपैकी 20 पालकांकडे Android phone आहेत. मुलांचा अभ्यास बंद होऊ नये म्हणून पालकांचा शाळेच्या नावाने whats app ग्रुप तयार केला. त्या ग्रुपच्या माध्यमातून दि. 25 मार्च 2020 पासून मुलांचा शालेय अभ्यास नियमित सुरु झाला...तो आजतागायत सुरु आहे. प्रत्येक वर्गानुसार अभ्यास ग्रुपवर तसेच वैयक्तिक पाठवण्यात येतो. मुलांनी वहीत केलेला अभ्यास पूर्ण झाल्यावर वाहिचा फोटो काढून मला पाठवतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास नियमितपणे चेक करून दिला जातो.  मुलाचे अभिनंदन देखील केले जाते. त्यातून त्यांचा उत्साह वाढण्यास मदत होते. जर केलेल्या अभ्यासात काही चुका झाल्या असतील तर 'हे चुकले आहे' असा रिप्लाय न देता, "हे गणित पुन्हा सोडवायला सांगा" असा शब्दप्रयोग केला जातो. त्यातूनच मुलांची online अभ्यासाची गोडी वाढत चालली आहे. मुले स्वतः आपल्या इतर मित्रांना सांगायला लागले. ज्या पालकांकडे android फोन नाही त्या मुलांचे देखील फोन यायला लागले. सर माझ्या काकाकडे, माझ्या चुलत्याकडे, माझ्या चुलतभावकडे व्हाट्स अपचा फोने आहे, आम्हाला त्यावर अभ्यास पाठवा. मुलांच्या उत्सहामुळे पालकांच्याही प्रतिक्रिया मिळतात...तुमच्या अभ्यासामुळे आमचा खूप त्रास कमी झालाय. मुलांना Online अभ्यासाचा आनंद वाटतोय. एखाद्या दिवशी अभ्यास पाठवायला उशीर झाला की मुलांचे फोन येतात... सर अभ्यास पाठवा.
       दि. 20 एप्रिल व 27 एप्रिल 2020 रोजी मा. निमा अरोरा मॅडम जि.प.जालना यांच्या मार्गदर्शनाखाली online चाचणी 1 व 2 घेण्यात आल्या. दोन्ही चाचणीमध्ये 100% मुलांनी सहभाग नोंदवला.
        आमच्या या छोट्या अभ्यासमालेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले ते म्हणजे- दि. 13 एप्रिल पासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषद, पुणे मार्फत सुरु झालेल्या "शाळा बंद... पण शिक्षण आहे." या अभ्यासमालेने. या अभ्यासमालेसाठी काही पालकांनी मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतले. त्यात त्यांना अडचणी देखील आल्या, पण वस्तीवरील smart फोन चांगल्या पैकी हाताळणाऱ्या मुलांना सांगून app डाउनलोड करून दिले. आता मुले रोज या अभ्यासमालेतील छोटे छोटे व्हिडीओ app च्या माध्यमातून पाहतात. ज्यांच्या कडे smart फोन नाही, ते मुले संध्याकाळच्या वेळी आपल्या शेजारील मित्राकडे जाऊन बघतात. मुलांना मजा वाटते. मुले आता या शिक्षणाला  "आपली मोबाईल शाळा" असे म्हणत आहेत.
         ग्रुपवरील अभ्यासमालेत आता पुढील इयत्तेतील घटकांचा समावेश केला आहे. मुलांना जर गणिताचा एखादा घटक सोडवता आला नाही तर व्हिडीओ call करून कसा सोडवायचा ते समजून घेतात. आज सकाळी एक छान अनुभव आला. 4थी वर्गातील सार्थक या मुलाने आजच्या अभ्यासमालेतील "कोरोना योद्धा" bookyboo.com या site वरून 'व्हायरस वीर' हे स्वतः चे पुस्तक डाउनलोड करून मला पाठवले. हे पाहून मनोमन वाटले की, चला मुलांचे शिक्षण कोठेही बंद नाही. मुले या माध्यमातून आनंद घेत आहेत. हे सर्व करण्यासाठी आमच्या बरांजळा साबळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमान म्हस्के सर व साधनव्यक्ती श्रीमान चंद्रशेखर देशमुख सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

             
शिक्षक :- श्री विघ्ने अंबादास कुशाबा
जि.प.प्रा. शाळा आनंदवाडी, कें. बरांजळा साबळे, ता.भोकरदन, जि. जालना.

साधनव्यक्ती :- श्री. चंद्रशेखर देशमुख

केंद्रप्रमुख :- श्री. एम. एन. म्हस्के

छायाचित्र:-


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com