18 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २१जि.प.प्रा. शाळा माहोरा, केंद्र - जयपूर , ता.मंठा

वर्ग-  1 ते 5
पटसंख्या- 88
                  
         आज आपल्या भारत देशात कोरोनाने  थैमान घातले व या कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाला शाळा बंद ठेवाव्या लागल्या.त्यामुळे शिक्षक पालक व शिक्षक विद्यार्थ्यी यांच्यात अंतर निर्माण झाले.याचाच परिणाम मुलांच्या शिक्षणावर होऊ लागला, पण यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने व जिल्हा प्रशिक्षण संस्था जालना यांनी तंञज्ञानाचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात केली.
             यात महाराष्ट्र शासनाचा "शाळा बंद....पण शिक्षण आहे." व जालना जि.प.चा ऑनलाईन चाचणी यासारखे तसेच तंञस्नेही शिक्षक आपल्या परीने ऑनलाईन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. डायट जालना मार्फत सुध्दा अवांतर वाचन,साहित्य,कला,खेळ, कार्यानुभव,स्पोकन इग्लिश,संगणक,विज्ञान, मजेत शिकुया विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी,याविषयी पुरेशी माहिती पुरवली जाते, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
          जि.प.प्रा शाळा माहोरा येथे आम्ही सर्व शिक्षकाच्या मदतीने पालकांचा व शिक्षणप्रेमी या मंडळीचा व्हाटसप ग्रुप बनवला,व गावातील जो व्हाटसाप ग्रुप आहे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वरील ऑनलाईन अभ्यासाबरोबर त्यांना दररोज वाचन व लेखन इतर अभ्यास पुरवला जातो
                    या ग्रुपच्या माध्यमातून जालना जिल्हा परिषदेने आयोजीत केलेल्या ऑनलाईन परीक्षा दोन्हीही चाचण्या यशस्वीपणे राबवला व यात 91% विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.दिक्षाॲप माध्यमातून डायट कडून येणारा दररोजचा अभ्यास मुलांना पाठवला जातो.
                    गावातील पालक सुध्दा ग्रुपच्या माध्यमातून अभ्यास मिळत असल्यामुळे समाधान  व्यक्त करतात. हा उपक्रम राबवत असताना आम्हाला आमचे गटशिक्षणाधिकारी श्री सतिशराव शिंदे साहेब, साधन व्यक्ती, श्री बायस सर, श्री गिर्हे सर, केंद्रप्रमुख श्री प्रमोद खंडागळे सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, तसेच आमच्या शाळेतील शिक्षक श्री जनार्धन बाहेकर व श्री मुरलीधर महात्मे सर यांनी सहकार्य केले.

वर्गशिक्षक   
श्री. अशोक फुपाटे सर 

साधन व्यक्ती :    
श्री. गिर्हे सर 

केंद्रप्रमुख :    
श्री. प्रमोद खंडागळे सर

छायाचित्र :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com