18 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - २०
जि.प.प्रा.शाळा, डाबकातांडा केंद्र -चिखली, ता.बदनापूर 


विद्यार्थी संख्या :39

           अचानक लोकडाऊन घोषित केल्यानंतर प्रत्येक मुलापर्यंत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोहोचण्याचे आव्हान आमच्यापुढे होते.पण हे आव्हानात्मक बदल स्वीकारण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी (मु.अ. आणि मी) स्विकारली. अगोदरच तयार केलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर आम्ही सुट्टी मधील नियोजन कसे असेल, त्याबाबत सूचना दिली. प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्यासबंधी नियोजन केले.दुसरीकडे SCERT ने दिक्षा एप्लीकेशन आधारित अभ्यासमाला सुरु केलीच होती. तसेच Leap for word चे उन्हाळी वर्ग सुरु झाले होते.प्रति गट 5 विद्यार्थी,असे एकूण  8 गट बनवून, ज्यांच्याकड़े Android Mobiles नव्हते त्या सर्वांना, Android धारकांसोबात समायोजित केले. आणि आमची आनंददायी पद्धतीने शिकण्याची प्रक्रिया सुरु झाली.अभ्यासमाला, LFW Reading techniques,लेखनावर भर, Bolo Application सारख्या शैक्षणिक साधनांचा वापर मुले आपल्या सोईनुसार, आवडीनुसार करू लागली.शिवाय डाबकातांडा गावातील तरुण वर्गाची यात भरपूर साथ मिळाली, मिळत आहे.अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा आढावा ,नियमितपने whatsup, zoom video calling ने मुलांशी,पालकांशी, तरुणांशी संवाद साधुन होऊ लागला,होत आहे.
पालकांचा सक्रिय सहभाग हेच या यशाचे मुख्य कारण आहे.

खालील उपक्रम सध्या राबावन्यात येत आहे:


1) SCERT मार्फत दैनिक अभ्यासमाला:
दिक्षा app वर आधारित SCERT मार्फत जी दैनिक अभ्यासमाला प्रकाशित होते, त्यातील गरजेनुसार विविध बाबी मुले शिकत आहेत.त्यामधे पाठ्यक्रमातील घटक,spoken English चे घटक, miss call देऊन स्टोरी ऐकणे,स्कॉलरशिप सराव अशा काही घटकांचा आवडीने अभ्यास केला.

2) LEAP FOR WORD reading practices:
यात मुले आपआपल्या गटात बसुन क्रमाक्रमाने मोठ्याने शब्दांचे वाचन व नंतर पूर्ण समुहाचे एकाच वेळी वाचन अशा पद्धतीने वाचनाचा पूर्ण सराव घेतला/केला जातो.

3) Best Enlish practices
 यात मुले सुंदर अक्षर लेखानाचा सराव करतात.नियमितपणे शेयरिंग करतात, त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते.

4) TARGET 30 AND 40
यात 2री व 3री च्या मुलांना 30 पर्यन्त पाढ़े व 4 थी,5वी च्या मुलाना 40 पर्यन्त पाढ़े पाठांतराचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.काही मुलांनी 40 पर्यन्त पाढ़े पाठांतर केले आहे.दिव्या संजय राठोड या मुलीने 40 पर्यन्त पाढ़े पाठ केले.रोशन राजू राठोड, प्रतीक्षा विजय चव्हाण,आर्यन सुरेश पवार,आरती ज्ञानेश्वर चव्हाण या मुलांनी 35 पर्यन्त पाढ़े पाठ केले आहेत.बऱ्याच मुलांचे 30 पर्यन्त पाढ़े पाठ आहेत.

5) वाचनवेग
यात मुलांना  दोन पानांचे वाचन (भाषा, इंग्रजी) दररोज करण्यास सांगितले आहे.4 थी व 5वी  साठी 4 पाने वाचन, वेळ लावून करण्यास सांगितले आहे.मुलांना शिष्यवृत्ती ,स्पर्धा परीक्षेतिल उतारा वाचनाची सवय लावणे हा या उपक्रमा मागील उद्देश्य आहे. 

6) Bolo app
Bolo या interactive application च्या मदतीने मुले छान इंग्रजी संभाषणाचा सराव करतात.

7) online meeting
मुलांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी सोडवन्यासाठी whatsup आणि zoom app चा वापर करत आहो.यामुळे एक भावनिक नाते सुट्टीत ही कायम आहे.

8) DISTRICT ONLINE TEST, SCHOLARSHIP PRACTICE TEST
 मा.अरोरा मैडम(CEO ZP JALNA), व मा.दातखिळ साहेब(EO, PRI, ZP JALNA) यांच्या प्रयत्नातून घेतलेल्या online चाचनीत 100% मुलांनी सहभाग घेतला. scholarship practice test चा ही आनंद मुले घेत आहे.  •  प्रेरणा व मार्गदर्शन:
1)श्री. श्रीकृष्ण निहाळ सर
    आयटी विभाग, डायट जालना.
2)श्री. फुन्दे सर ,प्रा. शा. चनेगाव 
3)श्री. पांडे सर,प्रा. शा. विल्हाडी


  • विशेष सहकार्य:
सर्व आदरणीय गावकरी, शाळा व्यवस्थापन समिति,डाबकातांडा.


  • विशेष आभार:
1)मा.श्री कडेलवार साहेब , बीईओ, प.स. बदनापुर
2)मा.श्री जनबंधु साहेब, शि.वि.अ.
3)मा. श्री क्षीरसागर साहेब,शि.वि.अ.
4)मा श्री ढाकने सर ,कें.प्र, चिखली
5) मा.श्री.चंद्रकांत गोल्डे सर, साधनव्यक्ती, गसाके, बदनापूर 


  •  शिक्षक:-
1)श्री. प्रकाश कासार 
2)श्री.अक्षयकुमार जैस्वाल  •   छायाचित्रे :-

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com