18 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १९जि.प.प्रा.शा.पानखेडा के.काजळा ता.बदनापूर. 

            साधारण मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात कोरोना ने आपले पाय भारतात रोवायला सुरूवात केली आणि अचानकपणे आपल्या देशाचे पंतप्रधान मा नरेन्द्रजी मोदी यांनी lockdown जाहीर केले मग काय ?शाळेतील लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणारी शाळा अचानक बंद झाली. मुलांचा अभ्यास बंद झाला. शाळेला सुटी मिळाली. 
            सुरुवातीला सर्वांना सुटी मिळाली बरे वाटले पण नंतर मुलांना कंटाळा येऊ लागला .पालकांचे फोन विद्यार्थ्याचे फोन मॅडम शाळा कधी उघडणार? आम्हाला घरी बोर होतय ? म्हणुन मी मुलांना दररोज फोन द्वारे अभ्यास द्यायला सुरुवात केली. मुलं पालक फोनद्वारे अभ्यास विचारू लागले. शाळा जरी बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे या उद्देशाने शिक्षण विभागाने "शाळा बंद पण शिक्षण आहे" ही संकल्पना आणली व परत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर मा.CEO  मॅडम यांनी online test संकल्पना मुलांची गुणवत्ता वाढावी म्हणुन समोर आणली ज्याचा फायदा झाला.त्यासाठी मी पालकांचे वर्गवाइज group तयार केले. दररोज  group वर अभ्यासमाला पाठवत होते, इतरही काही link पाठवत होते . विद्यार्थी आवडीने test व अभ्यासमाला  सोडवत आहेत. काही पालकांकडे android mobile नव्हते. मग गावातील सुशिक्षित युवकांना विद्यार्थी वाटुन दिले व अभ्यासमाला चाचणी घ्यायला सांगितले त्यांनी पुर्ण सहकार्य केले.विद्यार्थ्याना अभ्यासाची गोडी निर्माण झाली. मुलांना mobile हाताळता येऊ लागला.परंतु या सर्व गोष्टी करत असताना पालकांचे वारंवार प्रबोधन करावे लागले याचा परिणाम असा झाला की काही पालक online teaching साठी mobile घेण्यास तयार झाले.नविन शिक्षणासाठी पालक वर्ग हळुहळू तयार होत आहे़. माझ्या या कार्यात मला मा.गटशिक्षणाधिकारी कडेलवार साहेब, के.प्र.खिल्लारे सर, के.मु.अ जोशी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोरोनाशी लढुया, online शिक्षण घेऊया.

वर्गशिक्षक- 
श्रीमती एस.जी .पापनवार

मार्गदर्शक-
केंद्रप्रमुख- श्री. खिल्लारे अण्णासाहेब
साधन व्यक्ती - श्रीमती जगदाळे मीरा

छायाचित्रे :Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com