17 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १८
जि.प.प्रा.शाळा देऊळगाव ताड, केंद्र - केदारखेडा, ता.भोकरदन 


 वर्ग - ते 7
पटसंख्या -121
      
       गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून कोविड-19 या आजारामुळे संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन आहे.त्याचाच परिणाम म्हणजे सर्व जग ठप्प झालेले आहे.यात आपल्या चिमुकल्यांच्या शाळाही बंद कराव्या लागल्या व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला.शाळा जरी बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे या उद्देशाने शिक्षण विभागाने "शाळा बंद पण शिक्षण आहे" ही संकल्पना आणली व परत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
    ऑनलाईन शिक्षणात भरपूर आव्हाने होती त्यात सर्व विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे,पाठवलेल्या लिंक भरण्यास अडचणी येणेरेंज चा प्रॉब्लेमपालकांचा निरुत्साह या सर्व आव्हानांचा प्रतिकार करून यातून मुलांचा दररोज अभ्यास घेणे चालू आहे.याकामी जालना डाएट चे आयटी विषय सहाय्यक श्रीकृष्ण निहाळ सर यांनी लिंक भरणे यासंदर्भात तयार केलेल्या ppt अतिशय उपयुक्त ठरल्या तसेच diksha app चा वापर कसा करावा याबाबत केलेले मार्गदर्शन ऊपयुक्त ठरले व त्यानुसार विद्यार्थी diksha app चा वापर करू लागले.   
    आमचे आदरणीय केंद्रप्रमुख श्री भाले सर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्हीही आमच्या गावातील पालकांचा whatsapp  group बनवला.दररोज प्रत्येक शिक्षक वर्ग पहिला ते वर्ग सातवी या सर्व वर्गाचा स्वाध्याय या ग्रुपवर टाकू लागलो अन् बघता बघता ग्रुपवरील सर्व पालकांचे पाल्य त्याला उत्तम प्रतिसाद देऊ लागले.शाळेतील पालक ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे अश्या सर्व पालकांचा व्हॉट्सअँप ग्रुप बनवून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली.whats app group वर पाठविलेला स्वाध्याय पूर्ण करणे, ऑनलाईन चाचण्या सोडविणे अशा गोष्टी विद्यार्थी उत्साहाने करू लागले.
     शाळेतील शिक्षक श्री मन्मथ व्हनराव सर यांनी त्यांच्या manmathvhanrao.blogspot.com  या blog ला जोडलेल्या शैक्षणिक pdf file याचा फायदा हि मुलांच्या अभ्यासासाठी झाला.तसेच शासनाने बनविलेले diksha हे अँप ज्यामध्ये सर्व वर्गांचे प्रत्येक घटकाचे व्हिडिओ त्यात आहेत याचा खूप उपयोग विद्यार्थ्यांना झाला. त्याचबरोबर डाएट जालना यांच्या अभ्यासमाला या उपक्रमाचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. त्यानंतर जि.प. जालना यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन चाचण्या सोडवून घेण्यात आल्या यात विद्यार्थ्यानी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. व अशा प्रथमच ऑनलाइन चाचण्या सोडवल्याचा आनंद आपल्याला झाल्याचे मनोगत बऱ्याच विद्यार्थ्यानी व्यक्त केले. तसेच गावातील पालकांचा whats app group तयार करण्याकामी शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री. रामदास गाडेकर यांचीही खूप मदत झाली.   
    अशा मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेला विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.यातून विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण जरी नाही मिळाले तरी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी लक्षात येऊन पुढील शैक्षणिक वर्षात याचा भरपूर उपयोग होईल.यात केदारखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भाले साहेब यांनी पालकांचे उद्बोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले .तसेच श्री श्रीकांत सुरडकर (आयटी CRG) यांनी घेतलेल्या Tag seminar असो किंवा zoom meeting द्वारे केलेले मार्गदर्शन असो सर्व शिक्षकांना अतिशय उपयुक्त ठरत आहे.
    
मार्गदर्शक - 
श्री भाले आर.पी. (केंद्रप्रमुख)
श्री.चंद्रशेखर देशमुख (साधनव्यक्ती)
केदारखेडा ता.भोकरदन

मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक -
श्री गव्हाणे डी. जे.( वर्ग ५) (मु. अ.)
श्री व्हनराव एम .आर. ( वर्ग १ व २)
श्री गायकवाड आर.ए.(वर्ग ४ व ७)
श्री मेहेत्रे ए. एस.(वर्ग ३ व ६)

छायाचित्रे :Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com