17 May, 2020

अभ्यासामाला यशोगाथा - १७

जि.प.प्रा. शाळा वरखेडा (सिंद.) केंद्र - वाघरूळ (ज.) ता.जालना

              शाळा बंद पण शिक्षण आहे, अभ्यासमाला हि दैनिक स्वरूपात दररोज प्रसिद्ध होत आहे. या मालीकेला दि.14 एप्रिल 20 पासून सुरुवात झाली. आज 30 वा अंक प्रसिद्ध झाला. Lock Down च्या काळात घरीच राहून आपण सर्वानी कोव्हिड 19 या जागतिक संसर्गजन्य विषाणू चा मुकाबला करणार आहोत.मला खात्री आहे आपण या विषाणूला पळवून लावू .                                                              
             महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत हि अभ्यासमाला सुरू केली.परिषदेचे संचालक मा.दिनकर पाटील साहेब यांनी हे कार्य Lock Down च्या काळात जोमाने सुरू ठेवले,याबद्दल साहेबांचे खास अभिनंदन ! या अभ्यासमाला उपक्रमांमुळे राज्यातील शिक्षक बंधु भगिनी व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ लागले. शिक्षकांच्या सहकार्याने DIKSHA APP Download करून त्याचा वापर कसा करायचा या बाबत मार्गदर्शन करीत होते.माझ्या शाळेतील विद्यार्थी चाचणी एक व दोन सोडवत असे. ग्रामीण भागातील पालक सुरुवातीला थोडा उदासीन दिसत होता. परंतु आपला पाल्य मोबाईल वर पेपर सोडवत आहे  हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असे. त्यांचा सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. ते माझ्याशी संपर्क करून विचारपूस करीत होते.यापूर्वी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करतांना मोबाईल चा वापर थोड्या प्रमाणात होत असे. पण आता विद्यार्थी आपल्या पालकांचा  Android मोबाईलचा अभ्यासमालेसाठी वापर करत आहेत.  
        आता ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अभ्यासात करतांना दिसत आहे .हेच या अभ्यासमाला उपक्रमाचे यश म्हणता येईल.यामुळे विद्यार्थ्यांत अभ्यासाची स्पर्धा निर्माण झाली.भविष्यात स्पर्धा परीक्षेत हे विद्यार्थी निश्चितच यश संपादन करून आपल्या गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करतील यात शंकाच नाही.यासाठी वाघरूळ बीट च्या शिक्षण विस्तारअधिकारी मा.श्रीमती नाकाडे, केंद्रप्रमूख विजय चित्ते साहेब, मुख्याध्यापक श्याम खांडेभराड यांनी मार्गदर्शन केले                                      

वर्गशिक्षक -
श्री. बी .आर .जाधव  (प्रा .प .)           
जि .प .प्राथमिक शाळा वरखेडा (सिंदखेड )              
केंद्र - वाघरूळ जहांगीर ता .जि .जालना

साधनव्यक्ती- 
श्री.छगन जाधव 

केंद्रप्रमुख -
श्री.विजय चित्ते 
केंद्र - वाघरूळ जहांगीर ता .जि .जालना

छायाचित्रे:Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com