16 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १६जि.प.प्रा.ब्राह्मनाथ तांडा पांगरी गो ता.मंठा जि .जालना


वर्ग- १ ते ५
पट- १४

         अभ्यासमाला सादर करत असताना १७ मार्च पासून अचानक शाळा बंद आदेश आले.सगळच ठप्प झाले.मुलांचे पेपर अभ्यास जागच्याजागी थांबले. पण पुढे काय ? प्रश्न उपस्थित झाला. म्हणतात ना प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते.तसेच work from Home सुरू केले.पण हे करत असताना ९०%पालकांनकडे Android मोबाईल नव्हते. आम्ही एखाद्या वर्गाचे अध्यापन झाले की बहुपर्यायी प्रश्न देऊन अध्यापन झालेल्या घटकाची तपासणी करत होतो. पण शेवटच्या टप्प्यात होतो.काही घटकाचे अध्यापन बाकी होते . Diksha app मुलांना माहिती होते .मी माझ्या मोबाईल वर त्यांचा सराव घेत होती. मग बहुतेक पालकांन कडे मोबाईल नव्हते  एका सुजाण शिक्षीत एका मुलांच्या काकाची मदत घेऊन त्यांना diksha App download करायला सांगितले. त्यांच्या मदतीने घटक अभ्यासल्यानंतर मी बहुपर्यायी प्रश्न पेढी पाठवून मुलांची तयारी करून घेत आहे सर्व इयत्तेत असणाऱ्या मुलांची .तसेच इतर चाचण्या व अभ्यासपुरक माहिती पाठवून मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. "Learn From Home" विद्यार्थ्यांच सुरू आहे.

नमुना दाखल प्रश्न पेढी 
इ.३री परिसर अभ्यास
Online test-1 

खलीलपैकी कोणता पदार्थ शिजवला जात नाही?
१)डाळी  
२)तांदूळ
✔️३)गहू
४)भाज्या

२)खालील पैकी कोणता पदार्थ न शिजवता खालला जातो?
१)टोमॅटो
२)काकडी
३)केळीचे शिकरण
४)सर्व
       

  
अशा प्रकारची प्रश्न पेढी पाठवून मुलांचा नियमित सराव घेत आहे.आमचे गटशिक्षणाधिकारी श्री.शिंदे साहेब,साधनव्यक्ती श्री.गि-हे सर,केंद्रप्रमुख श्री.जाधव सर यांच्या मार्गदर्शनाने अभ्यासमाला सोडवून मुलांची शैक्षणिक तयारी करून घेत आहे. सतत पाठपुरावा व संपर्काने हे शक्य आहे.नक्कीच हे येणाऱ्या काळासाठी गरजेचे आहे.आपला पाल्य Online अभ्यास करतो या बाबीचा पालकांच्या चेहऱ्यावर आनंद  बघावयास मिळाला.
             सकारात्मकतेने विचारलं आप णच आपल्या मनांला की हे काम कसे होईल तर भरपूर मार्ग सापडतात व ते कार्य आपण तडीस नेवू शकतो.नक्कीच थोडा ञास होतो पण ते शक्य आहे.ग्रामीण भागात अनंत अडचणी आहे.मग आपण इतरांच्या सहकार्याने,मार्गदर्शनाने बेस्ट आयडीया वापरून कार्य तडीस नेवू शकतो या बाबीची प्रचिती  मला आली.


वर्गशिक्षिका -
श्रीमती प्रणिता लवटे 
जि.प.प्रा ब्राह्मनाथ तांडा
पांगरी गो.

साधनव्यक्ती-
श्रीमती ज्योती चव्हाण 

केंद्र प्रमुख -
श्री.बी.आर.जाधव 


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com