16 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १५


जि. प. प्रा. शाळा दैठणा बु. केंद्र राणी उंचेगाव ता. घनसावंगी
               मानवाच्या अतिहव्यासापोटी प्रकट झालेल्या  कोरोना-19 व्हायरस ने संपूर्ण जग दुःखाच्या खाईत लोटलं आहे.सर्व काही स्तब्ध झाले.शाळा बंद झाल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची ताटातूट झाली.परत शाळा कधी सुरू होईल याची  कसलीच  कल्पना नाही. शिक्षकच ते विद्यार्थ्यां पासून जास्त काळ कसे  दूर राहतील.करू लागले शिक्षक पालकांना आणि विध्यार्थीना फोन झाले विचारचक्र सुरु. म्हणतात ना  गरज ही शोधाची जननी आहे. तर, मग आहेच  मग काय लावला शोध सर्व शिक्षकानी. विद्यार्थ्यां जवळ जाण्याचा पर्याय शोधला . शिक्षण थांबत नाही कोरोनाला भीत नाही येऊ लागले सत्यात. 
           पालकांचा एक whatsapp ग्रुप बनविला.वर्ग वाईज  विधार्थी ग्रुप तयार केले.आणि सुरू झाला रोजच्या अभ्यासाचा प्रवास. आमच्या श्री ए.एम.  शेख सर यांनी रोज वर्ग वाईज विषय वाईज अभ्यासमाला  तयार करून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नवीन जगाची ओळख करून दिली.श्री नेमिनाथ ढाकणे सरांनी विध्यार्थीना स्व ची जाणीव करून दिली. यामुळे विध्यार्थीना  अध्ययनाची आवड निर्माण झाली.विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून मुख्याध्यापक श्री ढगे सर यांनी व मी  पालकांच्या मदतीने Diksha app विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतले. Diksha App चा व DIECPD Jalna अँड्रॉइड App चा वापर करून शासन स्तरावरील अभ्यासमाला आम्ही विध्यार्थी पर्यंत पोहचवत आहोत. विधार्थी यामध्ये रमून हसत खेळत शिक्षण घेत आहेत. अभ्यासमाला हा आता आनंददायी  हसत खेळत शिक्षणाचा पाया बनत आहे   .
             आता तर रोजची  अभ्यासमाला  विद्यार्थ्यांना स्वतःला पालक, वर्गमित्र यांच्या समोर मी किती हुशार हे सिद्ध करून दाखवायचे साधन झाले आहे. आमच्या शाळेने  अडचणी वर मात करून नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने चालवलेल्या अभ्यासमाला उपक्रम आम्ही यशस्वी राबवत आहोत. यामुळे झाले  सर्व स्तरावरून शिक्षक विध्यार्थी यांचे कौतुक सुरु झाले. आमच्या शाळेचे माजी smc अध्यक्ष श्री पंडितदादा जाधव  यांनी तर मा. मुखकार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून आभार व्यक्त केले.                     याकामी आम्हाला  मा. गटशिक्षणाधिकारी श्री जोशी सर, साधनव्यक्ती श्री सोलाटे सर , केंद्रप्रमुख श्री राजेश सदावर्ते सर, मुख्याध्यापक श्री ढगे सर यांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले.                                                     
वर्गशिक्षक -                                      
श्री कैलास खरात, जि. प. प्रा. शाळा दैठणा बु. केंद्र राणी उंचेगाव ता. घनसावंगी जि. जालना.

 छायाचित्रे:


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com