16 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १४जि.प.प्रा.शाळा विल्हाडी, केंद्र- दाभाडी, तालुका- बदनापुर


          बदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री कडेलवार साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी श्री जनबंधू साहेब, श्री क्षीरसागर साहेब, गटसमन्वयक श्री जुंबड सर यांच्या प्रेरणेने आणि दाभाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पोथरे सर, जि. प. प्रा. शा. विल्हाडी  शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक श्री सोनटक्के सर व शिक्षक वृंद, साधनव्यक्ती श्री मदन सर,तंत्रस्नेही आयटी विभाग DIET श्रीकृष्ण निहाळ सर यांच्या मार्गदर्शनाने जि. प. प्रा .शा. विल्हाडी शाळेतील इयत्ता सहावी, सातवी ,आठवी च्या विद्यार्थ्यांच्या 74 पैकी 60 पालकांचा दिनांक 22 मार्च 2020 ला व्हाट्सअप ग्रुप तयार केला. ऑनलाइन मार्गदर्शकाची, समुपदेशकाची , सुलभकाची भूमिका पार पाडीत  आहे.
      राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे "समय बदला है,अब साधन बदलना होगा" कोरोना प्रादुर्भावास यशस्वीपणे तोंड देण्यासाठी व व अध्ययन अध्यापन प्रक्रिया निरंतर चालु असण्यासाठी ऑनलाईन तंत्र शिक्षणाचा  खूप उपयोग होत आहे. 22 मार्च पासून  खालील उपक्रम  घेत आहे. 

 1) अध्ययन निष्पत्ती वर आधारित घटकनिहायऑनलाइन चाचणी- मी द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम 15 मार्च पर्यंत आटोपला असल्याने मी सरावासाठी इयत्ता सहावी, सातवी, आठवी चे विज्ञान व गणिताच्या प्रत्येक घटकावर स्वनिर्मित वस्तुनिष्ठ स्वरूपाची एक दिवसाआड व्हाट्सअप मार्फत चाचणीचे आयोजन केले विद्यार्थ्यांनी चाचणी रजिस्टरवर सोडवून चाचणीचा फोटो ग्रुप वर टाकले, त्यामुळे चाचणी सोडवण्याचा सराव झाला व द्वितीय सत्राची उजळणी ही झाली.
        याशिवाय जि प शिक्षण विभाग यांच्या चाचण्या, दीक्षा ॲप, SCERT महाराष्ट्र चे शाळा बंद... पण शिक्षण आहे - अभ्यासमाला, आयटी विभाग ,DIET जालना यांचे मार्गदर्शन व लिंक्स, दीपक फौंडेशन व गुरुजी वर्ड श्री संदीप गुंड सर यांचे यांच्या लिंक्स,RAA औरंगाबाद यांच्या इंग्रजी अध्यापनाच्या लिंक, दिपस्तंभ यांचे लिंक, स्टुडन्ट ब्रिज व डिजिटल साक्षर, श्री उद्धव फुंदे सर प्रा शा चनेगाव यांचे@ यूट्यूब चैनल, योग व प्राणायाम च्या लिंक यांचा ऑनलाइन अध्ययन-अध्यापन साठी खूप मदत मिळाली.

 2) नाविन्य पूर्ण विज्ञान प्रयोग शाळेतील प्रात्यक्षिके- जि प प्रा शा  विल्हाडी शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग शाळेचा  प्रयोगांचा संच आला असल्याने मी त्यातील काही मोजके प्रत्येकी तीन  प्रयोगाची प्रात्यक्षिके व्हिडिओद्वारे एक दिवस आड ग्रुप वर टाकले विद्यार्थ्यांनी ते बघून त्यानुसार निष्कर्ष रजिस्टरवर लिहिले.

 3) ज्ञान विज्ञान रांगोळी उपक्रम - विद्यार्थ्यांना रांगोळी काढणे आवडते. त्यामुळे घरातील उपलब्ध साधनांच्या  आवश्यकतेनुसार विज्ञान व गणित विषयातील विविध आकृत्या व संकल्पना यांची रांगोळी कडून आकृत्यांचे दृढीकरण होण्यास मदत झाली.

 4) केंद्रस्तरीय झूम मीटिंग- गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री कडेलवार साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक 26 एप्रिल रोजी दाभाडी केंद्रांतर्गत सर्व प्रथम सर्व शिक्षकांची, जि प शिक्षण विभाग मार्फत आयोजित चाचणी क्रमांक -2 चे मार्गदर्शन करण्यासाठी झूम मिटींगचे आयोजन करण्यात आले मिटिंगच्या कॉर्डिनेटर,  निमंत्रक होण्याचा सन्मान सरांनी मला दिला. तसेच  जि प जालना शिक्षण विभाग मार्फत जिल्हास्तरीय चाचणीमध्ये वर्ग सहावी, सातवी ,आठवी विज्ञान व गणित विषयाच्या प्रश्न निर्मितीसाठी सहभागी होण्याची संधी मिळाली.

 5) हँडवॉश उपक्रम- कोरोना प्रादुर्भावामुळे हात धुण्याची संकल्पना  ग्रामीण भागामध्ये अधिक दृढ करणे व जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वखर्चाने 1008  (पतंजली स्वदेशी  निम) साबणाचे 216 कुटुंबात व परिसरात  शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने  लॉकडाऊन काळात सोशल डिस्टन्स  चे पालन करून वाटप करण्यात आले.

 अडचणी- लॉक डाऊन काळामध्ये पालकांशी संपर्क स्थापित करण्यात व ग्रामीण भागातील पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात थोडी अडचण आली. बहुतांश पालक शेतामध्ये राहत असल्याने व त्यांच्याकडे इंटरनेटचे कनेक्शन नसल्याने ऑनलाइन  अदान -प्रदान मध्ये थोडी अडचण निर्माण झाली. तसेच बहुतांश पालकांकडे छोटा मोबाइल असल्यामुळे व्हिडीओ व फोटो डाऊनलोड होण्यास अडचण निर्माण झाली.

 पर्याय - उपरोक्त अडचणींवर पर्याय काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी, मात करण्यासाठी समस्त ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांच्या चर्चेतून शाळेवर प्राथमिक स्वरूपात 50 टॅब मुलांसाठी आणून जास्तीत जास्त त्यांना अध्ययन पूरक  साहित्याची उपलब्धता करून द्यावी. यासाठी "प्रथम" सेवाभावी संस्था चे औरंगाबादचे कॉर्डिनेटर श्री बडोघ साहेब यांनी उपलब्ध करण्याचे मार्गदर्शन केले.
तसेच 15 संगणकांनी सुसज्जित संगणक कक्ष स्थापन करण्यासाठी इन्फोसिस कंपनी व सी-डॅक मुंबईचे कॉर्डिनेटर श्री वैभव सिंह यांनी लॉकडाऊन नंतर  मदत करण्याचे आश्वासन दिले.

आपला विश्वासू,
श्री विनोदकुमार विक्रम पांडे(प्राप)
जि प प्रा शा विल्हाडी,  केंद्र- दाभाडी, तालुका- बदनापुर, जिल्हा- जालना

छायाचित्रे :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com