15 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १३

जि.प.प्रा.शा.मनापूर कें.वाकडी ता.भोकरदन

वर्ग- 1 ते 5
पटसंख्या- 76    

       कोरोना विषाणू मुळे अचानक शाळा बंद झाली आणि विद्यार्थी एकदम संभ्रमीत झाले की आता पुढे काय ?  संपूर्ण भारतावर ओढावलेल्या कोवीड-19 विषाणूच्या संकाटूतन सावरतांना शाळा बंद पण शिक्षण चालू या मोहिमेअंत् पालकांचे व्हाटस अप ग्रुप तयार केले. त्यावर सत्रातील राहीलेल्या अभ्यासक्रमाचे  यु टयूब वरचे विवीध व्हीडीओ शेअर केले. तसेच जिल्हा स्तरावरून पूरविण्यात आलेल्या लिंक दवारे दोन्ही चाचण्या घेतल्या. शाळा सुरू असतांना आम्ही QR कोड च्या मदतीने विद्यार्थांना पुस्तकातील संकल्पना समजावून सांगत होतो.परंतू लॉकडाऊन सुरू झाले आणि शाळा बंद झाल्या मग आमच्या समोर यक्ष प्रश्न होता तो म्हणजे विद्यार्थांपर्यंत दिक्षा  नेण्याचा ?  म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग मग काय गावातील तरुण मुलांची या साठी मदत घेण्याचे ठरविले.हे तरुण दिवस रात्र प्रामुख्याने मनोरंजनासाठी मोबाईलला पसंती देतात.या तरुणांशी वारंवार संपर्क साधून त्यांना दिक्षा प चे महत्व पटवून दिले.व हे प डाऊनलोड करण्याची संपूर्ण पध्दती एका कागदावर क्रमवार लिहून गावातील ग्रुप वर असलेल्या पालकांना व या तरुणांना फॉरवर्ड केली. आपल्या गावातील ज्या पालकांना हे प डाऊनलोड करण्यात काही अडचणी येत असतील तर त्यांना मदत करण्याच्या तरंणांना मोबाईलवरुन सूचना दिल्या.
             आता रोज अभ्यासमाला इयत्‍तानिहाय तयार केलेल्या ग्रुप वर पाठवून विद्यार्थी त्यांच्या सवडीनुसार सोडवत आहेत.ज्या विद्यार्था जवळ अनरॉईड मोबाईल नाही ते आपल्या मीत्रा/मैत्रीणी कडे जावून अभ्यासमाला(सुरक्षीत अंतर ठेवून) सोडविण्याचा प्रय्त्न करत आहेत.व आज जरी नेट पॅक संपला तरी रीचार्ज केल्यावर राहिलेल्या दिवसंची अभ्यासमाला नंतर एकदम टप्या टप्याने जरी सोडवली तरी चालते असे त्यांना सांगीतले आहे. व दिक्षा  वरील व्हीडीओ विद्यार्था बघत आहेत. एकंदरीत तंत्राज्ञानाच्या सहाय्याने एक वेगळया शैक्षणीक अनूभूतीची प्रचीती या चिमूरडयांना येतेय हे मात्र निश्चीत...‍             
वर्गशिक्षक/मुख्याध्यापक –
श्री सचिन विजयराव शास्त्री
सर्व सहकारी शिक्षक- दांडगे सर व सुलताने सर
रमेश दसपुते(अध्यक्ष)शा.व्य.स.मनापूर

मार्गदर्शक -
साधनव्यक्ती– श्री. संतोष काकडे
केंद्रप्रमुख– श्री आर.एस.लांडगे.

छायाचित्रे :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com