15 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १२जि.प.प्रा.शाळा उमरखेडा,केंद्र-राजूर, ता-भोकरदन


        लॉकडाऊनमुळे अचानकपणे शाळांना सुट्टी द्यावी लागली आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुरू असलेली अध्ययन अध्यापन प्रक्रिया अचानक खंडित झाल्याने आता या निरंतर चालणाऱ्या शिक्षण प्रक्रियेला वळण कसे द्यावे याचा प्रश्न मनात निर्माण झाला... याचवेळी सुरवातीला कोरोना आजारासंबंधित सूचना मी माझ्या वर्गातील पूर्वीपासून सुरू केलेल्या व्हाट्सअप्प ग्रुपवर पाठवल्या... आणि आता आपल्या शाळेचा अभ्यास सुद्धा यावरच द्यावा या उद्देशाने दिनांक 17 मार्च पासूनच मी (ज्ञानेश्वर गणपत झगरे )आणि आमचे मुख्याध्यापक श्री घायाळ सर, तसेच सहकारी श्री पऱ्हाड सर, श्रीमती काळे मॅडम यांनी आपापल्या वर्गाचे व्हाट्सअप्प ग्रुप बनवले व त्यावर दररोजचा अभ्यास दिला जाऊ लागला.. यामध्ये माझा पहिला वर्ग असल्याने मी मुद्दाम पालकांना दररोज अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर माझ्याकडून आकर्षक बक्षिसे दिले जाईल असे सांगितले आणि अगदी सर्वच मुले ,ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नव्हता ते सुद्धा इतरांच्या मोबाईलवर माहिती घेऊन आपापला अभ्यास ग्रुपवर टाकू लागले... तसेच यांनंतर स्काईप कॉल च्या माध्यमातून सुद्धा व्हीडिओ कॉल करून विद्यार्थ्यांशी चर्चा होऊ लागली. 
          विद्यार्थ्यांना दररोज दीक्षा अँप व bolo अँप च्या लिंक च्या माध्यमातून अभ्यास देत गेलो आणि आजपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासाशी हसत खेळत गुंतवणूक ठेवता आलं.
         माझा वर्ग पहिलाच असल्याने मुलांना मी मुद्दाम घरातील वस्तू मोजणे, चित्रे काढणे, मातीकामातून वस्तू बनवणे, पाने,फुले,बिया यांची डिझाईन बनवणे असा कृतिशील अभ्यास अभ्यासमालेतून मिळतो याचा लाभ मुलांना होत आहे.
           नक्कीच ऑनलाईन अभ्यास मला आजपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांशी जोडून ठेवा शकला आणि माझे विद्यार्थी दररोज या अभ्यासाची वाट पाहतात ही बाब माझ्यासाठी एक अनमोल यशोगाथा म्हणूनच ठरली आहे.

मार्गदर्शन-
श्री आर.व्ही.पुंगळे सर (केंद्रप्रमुख, राजूर)
श्री.चंद्रशेखर देशमुख सर(साधनव्यक्ती )

सहकार्य-
श्री. डी.एल.घायाळ (मुख्याध्यापक)
श्री.डी.एन.पऱ्हाड 
श्रीमती. एस.काळे 

यामध्ये आवर्जून सहभागी पालक व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार..


श्री.ज्ञानेश्वर गणपत झगरे (स.शि.)
जि प प्रा शाळा उमरखेडा,
केंद्र-राजूर
ता-भोकरदन
जि-जालना           

छायाचित्रे :Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com