14 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - ११
जि.प.प्रा.शाळा धावडा उर्दू, केंद्र - वडोद तांगडा, ता. भोकरदन


पटसंख्या : २४७


         कोविड-१९ च्या पेंडेमिक काळात लर्न फ्रॉम होम संकल्पनेतून अभ्यासमाला (उर्दू) उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.विद्या प्राधिकरण  पुणे व DIET  जालना च्या माध्यमातून दररोज प्राप्त होणारी अभ्यासमाला(उर्दू) WhatsApp द्वारे विद्यारथ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक वर्गाचे व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत.प्रत्येक घरातील मोाईलवर मुलांचाच ताबा असतो. मुलांचा बराच वेळ गेम खेळण्यात जात होता.अभ्यासमलेनंतर परिस्थिती बदलली आहे.अभ्यासमालेमुळे आता विद्यार्थी तंत्रज्ञानांचा वापर करून अभ्यास करत आहे.अभ्यासमालेच्या माध्यमातून शिक्षक- विद्यार्थी - पालक हा शैक्षणिक त्रिकोण प्रभावीपणे काम करत आहे.
            अभ्यासमालेसोबत शाळेतील मुख्याध्यापकानी सर्व शिक्षकांना (उर्दू , मराठी , इंग्रजी , विज्ञान , गणित, चित्रकला, क्राफ्ट ) या विषयांवर आधारित ३००० पेक्षा जास्त शैक्षणिक व्हिडिओ  व वर्कशीट चा संग्रह व्हॉटसअप द्वारे उपलब्ध करून दिला आहे. दररोज अभ्यासमलेसोबत विषयानुसार वर्कशीट  व्हिडिओ प्रत्येक वर्गाचे व्हॉटसअप ग्रुप वर टाकण्यात येतात. विद्यार्थी वर्कशीट चे काम वही मध्ये पूर्ण करून त्याचे फोटो ग्रुप वर टाकतात. वर्ग शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचे दररोज चे homework तपासून योग्य दुरुस्ती व आवश्यक सूचना देतात.
           अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थी आनंदाने घरी राहून अभ्यास करत आहेत. तसेच शिक्षक- विद्यार्थी - पालक संपर्क सकारात्मक रित्या दृढ होत आहे.मुख्याध्यापक व सर्व शिक्षक 

साधनव्यक्ती :
श्री.संदीप देशमुख 

केंद्रप्रमुख :
श्री.बी.एल.बडगे 

छायाचित्रे :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com