14 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - १०
जि.प.प्रा.शा आवलगाव (बु.) के. पानेवाडी ता. घनसावंगी 

वर्ग:  6 वा 
एकूण पटसंख्या:  मुले १३ + मुली १७=३० 

              या lockdown च्या काळात शिक्षक व विद्यार्थी यांची नाळ  न तुटू  देण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते दैनंदिन अभ्यास मालेने. होय या अभ्यासमालेमुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे तंत्रज्ञान हाताळण्याची सवय होऊ लागली आहे. तसेच पालकांनाही विशेषतः ग्रामीण भाग असल्याकारणाने भ्रमणध्वनीचा असाही वापर करता येऊ शकतो याचे ज्ञान होऊ लागले असून या उपक्रमाचे फार दूरगामी परिणाम नंतरच्या काळात ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रावर होणार असून जि.प.शाळांना निश्चितच अधिकचे चांगले दिवस येऊ पहात आहे.  
        अभ्यासमालेतील video, माहिती पाहून विद्यार्थी खूप आनंदी व उत्साही आहेत . ज्या मुलांच्या पालकाकडे  Android फोन, नेट वा range नाही त्यासाठी आम्ही pair learning ची संकल्पना सुरक्षित अंतर ठेवून म्हणजे (वेगवेगळ्या वेळा देऊन) राबविण्याचा प्रयत्न करत आहो. धन्यवाद अभ्यासमाला !! 
   तसेच या कामी DIET चे श्री. काकडे सर, केंद्रप्रमुख श्री. प्रशांत देव सर, मु. अ. श्री.एस.डी. जपे सर, शा. व्य. स. अध्यक्षा श्रीमती. शारदाताई ठेंगडे व समस्त सदस्य तथा माझे सहकारी सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

वर्गशिक्षक :                
श्री.विवेक वि.कुलकर्णी               
जि.प. प्र.शा.आवलगाव.(बु)
9423157060

साधनव्यक्ती :
श्री.प्रल्हाद सोलाटे 

केंद्रप्रमुख :
श्री. प्रशांत देव 
केंद्र:  पानेवाडी, ता.घनसावंगी 

छायाचित्रे :


Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com