30 May, 2020

अभ्यासमाला (दीक्षा ) यशोगाथा - ३२


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडा वसाहत, तालुका मंठा 

वर्ग 1 ते 4
विद्यार्थी संख्या 14

         सध्या covid-19 च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी दररोज आपल्याला अभ्यासमाला, ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम देण्यात येत आहे त्याचा फायदा निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना होत आहे. आम्ही आमच्या शाळेचे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले असून त्यावर ही अभ्यासमाला मुलांपर्यंत पोहोचवत आहोत.  तसेच मुलांनी मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड केले आहे. त्याचा ते नियमित वापर करत आहेत. मुलांनी ऑनलाईन टेस्ट सोडवलेल्या आहेत तसेच काही टेस्ट आम्ही तयार करून त्या सुद्धा सोडवून घेत आहोत. स्काईप या अॅप द्वारे मुलांचे  ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेण्यात येत आहेत. मी इथे युट्युब चे लिंक शेअर करत आहे. https://youtu.be/TEwyjFSl2Eo

          तसेच काही विद्यार्थी त्यांचा  रिस्पॉन्स फ्लीपग्रिड ॲप द्वारे डायरेक्ट शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. यावर्षी इयत्ता दुसरीत जाणारी हर्षदा हजारे हीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यासाठीची ही 
https://flipgrid.com/s/0d1921ff61d3  लिंक आहे. 

          यासाठी आमच्या तालुक्याचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे सर, केंद्रप्रमुख नागनाथ गोरे सर,  जगदीश कुडे सर, मुख्याध्यापक नामदेव चव्हाळ सर तसेच साधनव्यक्ती विद्या पतंगे व ज्योती चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 


छायाचित्रे :
व्हिडीओ :

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com