30 May, 2020

अभ्यासमाला (दीक्षा ) यशोगाथा - ३१


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळा पारध बु. ता.भोकरदन 


पटसंख्या: 143                                         
शिक्षक संख्या: 03  
                                                                                             
          कोविड 19 च्या प्रभावाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून शालेय विद्यार्थ्यावरही त्याचा परिणाम होऊन शैक्षणिक सत्र पूर्ण होण्याआधीच लॉक डाउन मूळे शाळा बंद कराव्या लागल्या परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ लागले .त्यावर उपाय म्हणून SCERT महाराष्ट्र शासनाने शाळा बंद शिक्षण सुरू या सदरात दैनंदिन अभ्यासमाला सुरू केली तसेच DIET जालना ने सुद्धा शिक्षण विषयक उपक्रम सुरू केले हे सर्व माझी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळा पारध बु ने पालकांशी संपर्क साधून ज्यांच्याकडे व्हाट्स अँप सुविधा असलेल्या पालकांचा वर्गवार ग्रुप बनवून त्यांना नियमितपणे व्हाट्स अँप वर SCERT व DIET च्या अभ्यासमाला देऊन त्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या तसेच नियमितपणे दिक्षा अँप चा वापर करून अध्ययन सुरू ठेवण्यास  विद्यार्थी व पालक यांना प्रेरित केले तसेच आमचे केंद्रप्रमुख श्री शिवाजी लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षकांनी एक गुगल लिंक तयार करून त्यावर वर्ग विषयवार प्रश्न संच देऊन ते विद्यार्थ्यांकडून नियमितपणे सोडवून घेत आहोत जे विद्यार्थी 10 पैकी किमान 7 प्रश्नांची बरोबर उत्तरे देतील त्यांना तेथेच उत्तरे सबमिट केल्याबरोबर एक प्रमाणपत्र डाउनलोड होऊन मिळते त्याचा उत्तम असा प्रभाव पडून बहुतेक मुले आनंदाने प्रतिसाद देत आहेत 
         या उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदी व उत्साही असून आणखी जास्त अभ्यास द्यावा अशी मागणी करत आहे तसेच यामुळे learning from home हे साध्य होत आहे. या कामासाठी मी जाकीर खान शब्बीर खान मुख्याध्यापक आणि माझे सहकारी मोहमद सदकात खालिक व सोहेल अहेमद अब्दुल कलाम नियमित परिश्रम घेत आहोत. 
        आम्हाला आमचे केंद्रप्रमुख श्री. शिवाजी लोखंडे हे सतत प्रोत्साहन देत आहेत तसेच श्री संदीप देशमुख व चंद्रशेखर देशमुख विषय साधनव्यक्ती भोकरदन हे सुद्धा मार्गदर्शन व मदत करीत आहेत.या सर्व उपक्रमास आमचे गट शिक्षणाधिकारी श्री शहागडकर साहेब हे सुद्धा उत्तेजन देत आहेत.

 गटशिक्षणाधिकारी: श्री.शहागडकर साहेब

 केंद्रप्रमुख: श्री.एस एस लोखंडे सर

 साधन व्यक्ती: श्री.चंद्रशेखर देशमुख, श्री.संदीप देशमुख

 मुख्याध्यापक: श्री.जाकीर खान शब्बीर खान


छायाचित्रे :Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com