29 April, 2020

DIKSHA App कविताDIKSHA APP  दिक्षा अ‍ॅप  दिक्षा अ‍ॅप आहे खास,
लाॅकडाऊन मध्ये होतो अभ्यास.  

तंञज्ञानाची धरूया सर्वजण कास,
सुट्टीत अभ्यासमालेची विद्यार्थ्यांना आस.

दिक्षा अ‍ॅप  वर गोड कविता गाणी
ऐकून शुद्ध होते सर्वांची वाणी.

सर्वांच्या घरी अँड्राईड मोबाईल,
दिक्षा अ‍ॅप  वर नव्या नव्या फाईल.

दिक्षा आहे आधार विद्यार्थी, शिक्षकांचा,
नव्या संकल्पनेमुळे फायदा होतो सर्वांचा.

दिक्षा अ‍ॅप  साह्याने वस्तू तयार करू छान,
घरातील सर्वजण आम्हास देतील मान.

दिक्षा अ‍ॅप  वापरा सांगितले गुरूजीने,
प्ले स्टोअर वरून डाऊनलोड केले पालकाने.

शिष्यवृत्ती परीक्षेची करू तयारी,
आकाशात उंच घेऊ आम्ही भरारी

प्राथमिक ते माध्यमिक सर्वांसाठी अभ्यास,
गुरूजी प्रत्यक्ष शिकवतात असे वाटते आम्हांस

शाळा बंद पण शिक्षण आहे अभ्यासमाला छान,
प्रतिसाद देऊन होऊ आपण गुणवान .श्रीधर यशवंतराव कुलकर्णी

जि.प.प्रा.शा.बारसवाडा के.डोणगाव ता.अंबड
जि.जालना.
मो.नं. 8275270791Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com