28 April, 2020

अभ्यासमाला-१४

 दि.२७ एप्रिल २०२०  वार-सोमवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-१४)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    १३ एप्रिल ते २६ एप्रिल 2020 या कालावधीत आपण *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या अभ्यासमाला पाहिल्या आणि त्यावरील प्रश्नमंजुषाही सोडवल्या असतीलच!
      आजपासून आपण सुरू करत आहोत  विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम आपण कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे.इयत्ता ५  वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आजपासून आपण सुरू करत आहोत.

         सद्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


*कला/हस्तकला*
टिकल्यांची कलाकृती-भिल्ल हरीण

*स्पोकन इंग्लिश*
Sound of consonant+vowel combination

*संगणक विज्ञान*
माऊसचा इतिहास आणि प्रकार

*संगीत/नाटक*
नाटक - नाटकाचा पाऊस

*मजेत शिकूया विज्ञान*
साधी फुग्याची नाव

*आता कचरा नाही*
प्लास्टो - आपला हिरो

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*


विषय - मराठी
पाठ - जय जय हे भारत देशा

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*


*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - रोमन संख्या
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - परिमेय संख्या

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com