26 April, 2020

अभ्यासमाला १

*दि.१३ एप्रिल २०२०, सोमवार*

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे*


*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला* 

*नमस्कार,विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!*

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. *घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!*

   *सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत.* परीक्षा रद्द झाल्या आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन *तुमचं शिकणं चालू असेलच!* आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या *शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे.*
     म्हणूनच  या लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी *ऑनलाईन अभ्यास!* त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल.त्यासाठी खालील लिंकला टच करा.

त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या सुचनेतील *विषयनिहाय पाठनिहाय* लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे.

    *चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!*

*आजचा विषय-मराठी*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-वाचनपाठ-४*


*इयत्ता-दुसरी*
*पाठ-फुग्या रे*

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-ट्राफिकदादा*

*इयत्ता-चौथी*
*पाठ-आभाळमाया*


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-पाण्याची गोष्ट*

*इयत्ता-सहावी*
*पाठ-नवा पैलू*

*इयत्ता-सातवी*
*पाठ-कोळीण*

*इयत्ता-आठवी*
*पाठ-गे मायभू*

*इयत्ता-नववी*
*पाठ-वनवासी*


 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com