05 December, 2019

वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव देणारी शाळा

वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव देणारी शाळा

🔹 PGI अंतर्गत उपयुक्त शाळा भेट

🎯 शिक्के कट्यार

शिक्के कट्यार हा उपक्रम म्हणजे या शाळेचे खास वैशिष्ट्य. प्रत्येक मुलाच्या गणित मूलभूत क्षमतेच्या
विकासासाठी श्री चव्हाळ सर यांनी तयार केले हे शिक्के कट्यार. शिक्के कट्यार मधील शिक्के व इतर
साहित्य यांच्या साह्याने सर्व विद्यार्थी करतात बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चढता उतरता क्रम
इत्यादी क्रिया. अगदी इयत्ता पहिलीची मुल ही बेरीज वजाबाकी क्रिया करताना दिसतात.

🎯 तंत्रज्ञानातून शैक्षणिक गुणवत्ता विकास

शाळेमध्ये उपलब्ध दोन टीव्ही संच चा चांगला उपयोग शिक्षक विद्यार्थी करीत आहेत.
DIKSHA एप्लीकेशन चा वापर प्रभावीपणे होत आहे. व्हर्च्युअल क्लासरूम च्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना जागतिक सफर घडवून आणली जात आहे. प्रत्येक मुलाची कम्युनिकेशन स्किल
या माध्यमातून डेव्हलप होत आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्य प्राप्तीसाठी तंत्रज्ञानाचा 
वापर या ठिकाणी होत आहे.

🎯 We learn English programme 

परभणी रेडिओ वर घेतला जाणारा We learn English programme विद्यार्थ्यांना पोर्टेबल स्पीकर
च्या माध्यमातून नियमित ऐकवला जातो व इंग्लिश कन्वर्सेशन सराव घेतला जातो त्यामुळे मुलांचा
इंग्लिश बोलण्यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे.

🎯 स्व निर्मिती साहित्याचा प्रभावी उपयोग
विद्यार्थी गरजेनुरूप सर्व विषयांचे वैविध्यपूर्ण स्व निर्मीत शैक्षणिक साहित्य शिक्षकांनी तयार केले आहेत
या माध्यमातून विद्यार्थी स्वतः शिकण्याकडे वाटचाल करत आहेत मुलांच्या संकल्पना सहजपणे स्पष्ट
होण्यास मदत होत आहे.

🎯 मराठी,गणित,इंग्रजी पेटी ठरत आहे एक वरदान

मराठी गणित व इंग्रजी पेटीतील दर्जेदार साहित्यांचा वापर नियमितपणे व प्रभावीरीत्या शाळेतील शिक्षक
करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ या साहित्याचा होत आहे.

शाळा:
जि.प.प्रा.शाळा, बरबडा वसाहत केंद्रः केंधळी ता.मंठा 
वर्ग : 1 ते 4 

सृजनशील शिक्षक :
श्री चव्हाळ सर व श्रीमती मुळे मॅडम 
<
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com