09 October, 2017

Website launched

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जालनाने विकसित केले आपले संकेतस्थळ !             दि.०९  ऑक्टोबर २०१७  
       

 

         जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जालनाने  जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच सर्व शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपयोगी पडेल असे स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले आहे.या संकेत स्थळाद्वारे जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या सोडविण्याचा मार्ग सुकर होणार आहे.त्याचे उद्घाटन आज दि.०९  ऑक्टोबर २०१७ रोजी मा.दिपकजी चौधरी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जालना यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या बद्दल प्राचार्य व सर्व DIECPD टीम चे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..
             या संकेतस्थळावर शिक्षकांच्या यशोगाथा देखील प्रकशित केल्या जाणार आहेत.विद्यार्थी स्थलांतर १००% थांबविणाऱ्या केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक यांची दखल वेबसाईट वर घेतली जाणार आहे. अ श्रेणी मधील शाळांचे उपक्रम वेबसाईट वर उपलब्ध करून  दिले जाणार आहे. विद्यार्थी गुणवत्ता संपादणूक वाढविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे उपक्रम वेबसाईटवर प्रकाशित केले जाणार आहेत.  या संकेतस्थळावर आपले उपक्रम फोटोसाहित  https://diecpdjalna@gmail.com या मेलवर पाठविण्याचे आवाहन मा.प्राचार्य यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना केलेले आहे.
               प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात जालना  जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने या संकेतस्थळाचा फायदा येत्या काळात हजारो शिक्षक व लाखो विद्यार्थ्याना होणार आहे.व त्यांद्वारे आपला जिल्हा प्रगत होण्यात एक मोठे पाउल टाकले जाणार आहे.या संकेतस्थळाचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्थेने व शिक्षण विभागाने सर्वाना केले आहे.
            या संकेतस्थळावर जिल्हा परिषद ,सर्व संस्था , इंग्लिश स्कूल व इतर सर्व माध्यामाच्या शाळेत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध विषयांच्या स्वतंत्र हेल्प लाईन दिलेल्या असून भाषा ,गणित, तंत्रज्ञान ,विज्ञान ,सामाजिक शास्त्र, इंग्रजी अशा विविध हेल्प लाईन दिलेल्या आहेत.एवढेच नव्हे तर यामध्ये शिक्षक आपल्या शैक्षणिक समस्यांची नोंदणीही करू शकणार आहेत.समस्या प्राप्त झाल्यानंतर शिक्षकाची समस्या संबंधित विभागाकडे थेट वर्ग होईल.व त्यावर विहित वेळेच्या आत विविध मार्गांनी जसे की मोबाईल संभाषण, व्हाटस अप संभाषण तसेच प्रत्यक्ष समस्येच्या स्थळी भेट देऊन समस्या सोडविली जाणार आहे.
              या संकेत स्थळाचा आणखी विविध प्रकारे फायदा आपल्या जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला होणार आहे.या संकेत स्थळावर शिक्षकांना विविध तंत्रज्ञानावर आधारित ई-साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.ज्यायोगे शिक्षक प्रत्यक्ष अध्यापनात त्याचा वापर करेन व परिणामी लाखो विद्यार्थ्याना त्याचा फायदा आपोआप होणार आहे.या सोबतच बदलत्या काळाबरोबर येणारे नवीन संशोधन, नवीन अध्यापन पद्धती ,तंत्रज्ञान ,नवीन संकल्पना अशा प्रकारची अतिशय नवीन व शिक्षक उपयोगी पर्यायाने विद्यार्थी उपयोगी माहिती येथे एका क्लिक सरशी उपलब्ध होणार आहे.
              या संकेत स्थळाची निर्मिती करण्याची प्रेरणा DIECPD चे प्राचार्य मा.डॉ.जे.ओ.भटकर यांनी शिक्षणाधिकारी (प्रा) मा.श्री पांडुरंग कवाणे  यांच्या समन्वयातून दिली तर प्रत्यक्ष वेबसाईट निर्मिती श्री.श्रीकृष्ण निहाळ IT विषय सहाय्यक DIECPD जालना यांनी केली. DIECPD जालना सर्व टीमची मोलाची साथ यासाठी लाभली.
                               या संकेत स्थळाचे उद्घाटन सन्माननीय दिपकजी चौधरी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जालना यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी मा.डॉ.जे.ओ.भटकर प्राचार्य DIECPD , मा.डॉ प्रकाश मांटे अधिव्याख्याता,मा.नूतन मघाडे,समता कक्ष विद्या प्राधिकरण, विषय सहाय्यक DIECPD जालना  सर्व श्री.सुनील मावकर,श्री.भाऊसाहेब काकडे ,श्री.जयंत कुलकर्णी ,श्री.श्रीकृष्ण निहाळ  तसेच श्री.राजे सर  साधनव्यक्ती,श्री.कुडे सर उपस्थित होते.
                

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com