08 October, 2017

Ghansawngi psm


घनसावंगी तालुका  रचतोय लोकसहभागातून( .लर्निग चा )इतिहास🙏


आज दि.15/10/2016 रोजी वाचन प्रेरणा दीन डाॅ..पी.जे .अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून के.प्रा.शा.साकळगाव प्रा.शा.हातडी येथे .लर्निग चे उद्घघाटन झाले .प्रसंगी  खालिल मान्यवर  उपस्थित होते . डाॅ.अचला जडे (उपसंचालक SCERT) डाॅ.श्री .जे..भटकर (प्राचार्य DIET जालना) श्री.कैलासजी  अंडील (तहसिलदार घनसावंगी )श्री .संजय येवते (जेष्ठ अधिव्याख्याता  DIET जालना) श्री.राजेश तांगडे (B.D.O.   घनसावंगी ) श्री .विपूल भागवत (.शि..घनसावंगी) श्री .एस.जी .साबळे (शि.वि..घनसावंगी) सदरील मान्यवरानी उद्.प्रसंगी विचार व्यक्त केले.        
     डाॅ.अचला जडे :-मुलांशी प्रत्यक्ष संवाद  साधून आज प्रेरणा  दीनानिमित्य कोणते  पुस्तक  वाचले ?खरेच पुस्तके वाचली का?संबधित विविध प्रश्न विचारून मुलांच्या  ज्ञानाच्या कक्षा जाणून  घेतल्या..लर्निग चे फायदे अध्यापणामध्ये कीती महत्व आहे या विषयी  सविस्तर माहीती दीली.  
         डाॅ.श्री .जे..भटकर  :-
 शिक्षणाचे महत्व विषद  करताना ज्या  पध्दतिने मानव पाण्याशिवाय जगू शकत नाही त्याच पध्दतिने शिक्षणाचे  महत्व पटवून दीले .माणसाने ध्येयवादी होऊन जीवन जगावे याचेच मर्म सदरील गावाना कळाले म्हणून इथल्या सर्व पालकाना शुभेच्छा! कारण (पेरले तेच उगते) आधुनिक शिक्षणाची दारे आपल्या  गावात उघडली आहे याचे सर्व श्रेय पालकांना शिक्षकाना दीले.                                 
    श्री.कैलास अंडील :-आजच्या पिढीला  जगातील नविन आव्हान स्विकारायचे असेल तर नविन तंञज्ञानाचा अध्यापनामध्ये निश्चितच फायदा होतो .शाळा .लर्निग झाल्यामुळे मुलाना फायदा  होणार  आहे.माझ्याकालावधी मध्ये अशा सुविधा मीळाल्या असत्या  तर आणखी माझी प्रगती झाली असती असे भावनिक  उद्दगार देखिल त्यानी  काढले त्यामुळे गावातील लोकानी लोकवर्गनी करून लर्निग केल्याबद्दल आभार मानले .                
    श्री.संजय येवते  :- ज्ञानाच्या ध्येयासत्क आसक्तीचे उत्तम उदा म्हणजे डाॅ..पी.जे.अब्दुल कलाम  आझाद  होय .स्वत:च्या बाल्यअवस्थेपासून शिक्षणासाठी सतत संघर्ष करत एक सामान्य नागरीक ते भारताचे राष्टॢपती पद ,एक संशोधक जो प्रवास केला याचे सविस्तर विवेचन सरांनी केले विद्यार्थ्याना कलाम साहेबांचे विचार स्पष्ठ करून सांगितले .             
        श्री .राजेश तांगडे :-   सदरील  शाळेचा  मी विदयार्थी आहे त्यामुळे या ठीकाणची शाळा लर्निग उदघाटण करत असताना  मला आनंद  होत  आहे. मुलानी  आधुनिक  तंञज्ञानाचा अवलंब  करावा आपले ज्ञान वृध्दिगंत करण्याविषयी  सूचना   दील्या .        
       श्री.विपूल भागवत :-सदरील दोन्हीही शाळा प्रगत शाळा आहे .या शाळेतील   शिक्षक अतिशय मेहनती होतकरू  आहेत त्यानी सर्व गावकर्यांचा विश्वास  संपादन करून लोकवर्गणीतून  शाळा  लर्निग केल्याबद्दल सर्व शिक्षक गावकर्यांचे  कौतुक केले भावीवाटचाली साठी शुभेच्छा  दील्या.         
     सदरील  कार्यक्रमाचे प्रास्तविक  श्रीमती  कांबळे  मॅडम  यानी  केले  तर कार्यक्रमासाठी  नियोजन  केप्र .जोगडे सर,सोळूंके सर, हरदास सर .विषय तज्ज्ञ सोलाटे पी.आर., बुलबुले  .एस.श्रीमती  गडदे  एम.    दोन्ही  शाळेतील शिक्षक  उप होते

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com