08 October, 2017

कार्यप्रेरणा कार्यशाळा

आज दिनांक 05.10.2016 रोजी गटसाधन केंद्र घनसावंगी येथे PSM अंतर्गत मु कार्य प्रेरणा शिबिर संपन्न झाले. त्यामध्ये उपस्थित मान्यवरानी खालिल प्रमाने विचार मांडले...
👉प्रास्ताविक:- मा.श्री विपुल भागवत (गशिअ)
         👉मा. कैलासजी अंडिल (तहसीलदार घनसावगी) शाळा स्तरावर शिक्षकानी लर्निंग करण्यासाठी समाजाचा सहभाग घेतला तर सर्व शाळा थोड्याच दिवसात लर्निंग होतील. लोक प्रतिनिधि कड़े जा, त्याना लोक वर्गणी मागा. प्रत्येक पालकाला भेटा लर्निंग चे महत्व सांगा . लर्निंग मूळ उपस्थितीत वाढ होते लोकांचा सभाग घेताना कुठलीही शंका मनात घेउ नका हे सर्व तुम्ही करू शकता. ज्या ठिकाणी लोक वर्गणी होणार नाही त्याठिकानी मला बोलवा. मी स्वतःशासन स्तरावर प्रयत्न करेन. laptop वीज कनेक्शन संदर्भात स्वतः प्रशासनाशी बोलेल. डिसेम्बर 2016 पर्यन्त तालुक्यातील सर्व जि.. शाळा लर्निंग करायच्या आहेत. एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून साहेबांची तालुक्या विषयी विद्यार्थ्या विषयी असणारी आत्मियता त्यांच्या बोलन्यातुन दिसून आली.....
👉मा. डॉ. श्री जे.ओ.भटकर साहेब (प्राचार्य DIET जालना) यांनी आज तालुक्यातील सर्व मु ना मार्गदर्शन करून एक आदराचे स्थान निर्माण केले. शिक्षनाला नशा बनवा ती नशा गुरुजिची असावी . जे पाहिजे त्याचा विचार करा जीवन वाळवंट बनऊ नका. नकारात्मक प्रवृतीचा आपल्या स्वतःच्या
जीवनावर परिणाम होतो. माणूस फ़क्त 2% बुद्धी चा वापर करतो 98% बाजूला जाते म्हणून विकास होत नाही. स्वतःमधील सामर्थ्याला हाक द्या. विचारप्रक्रीया बदलली की माणव निर्माण होतो.3% लोक ध्येय समोर ठेवून जीवन जगतात. ध्येय सक्त जीवन म्हणजे जीवन होय. अबोध मनाला हाक द्या. जीवनाचे सामर्थ्य हे विश्वासा मध्ये आहे स्वतहाच्या जीवनाचे चालक व्हा. न्यूनगंड बाळगु नका. जीवन हे आनंदाचे नाव आहे म्हणून आनंददायी रहा मग बघा आनंदाने शालेमध्ये तुम्ही रमून जाताल शाळा थोड्याच दिवसात तुम्हाला प्रगत दिसतील असे सुन्दर विचार देऊन शिक्षकांचे समुपदेशन केले....
👉मा. श्री संजयजी येवते साहेब यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये शिक्षकाना आपल्या विचार मंथनात गुंतवून ठेवले. शाळेमध्ये लोक सहभाग मिळवण्यासाठी गावातील लोकांचा एक watsapp group बनवा. तुमच्यात प्रबळ इच्छाशक्ति असेल तर तुम्ही नेतृत्व कराल.. स्वताचे खरे रूप समोर ठेउन काम केले तर प्रगति होते.. बोलण्यातुन मानूस 7% शिकतो तसेच अनुकारनातुन 40% शिकतो तर अनुभवातून 53% शिकतो. त्यामुले प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी अनुभव विश्व देऊन स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करा...
psm अंतर्गत 25 मुद्द्यांचे सुन्दर विवेचन साहेबानी केले..
👉 मा. राजेशजी तांगड़े साहेब (गट विकास अधिकारी) शाला लर्निंग करण्या संदर्भाने ग्रामसेवक मला पालक भेटीसाठी बोलावले तरी चालेल. 14 व्या वित्त आयोगातिल निधि शाळेसाठी देण्यासाठी प्रयत्न करू विद्यार्थ्याच्या मदतीने वनराई बंधारे तयार करुण एक चांगला सामाजिक आदर्श निर्माण करु...
एक सुदर प्रेरणा शिबिर मा. गट शिक्षण अधिकारी भागवत साहेब यांनी सुन्दर विचारांची मेजवानी व अखिव रेखीव नियोजनाचे सर्व मु अ नि कौतुक केले...
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सोलाटे पी. आर. (साधनव्यक्ति) तर आभार प्रदर्शन राखुंडे सर के प्र यांनी केले...
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व के प्र व BRC कर्मचार्यांचे सहकार्य लाभले 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com